शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अपघातात देवदर्शनासाठी जाणारे आठ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:00 AM

जीपने देवदर्शनासाठी जाणाऱ्या एकाच कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही परिसरात उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून भरधाव वेगातील जीपने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात उभ्या ट्रकवर जीप धडकली : सर्व मयत एकाच कुटुंबातील

पाटोदा (जि. बीड) : जीपने देवदर्शनासाठी जाणाऱ्या एकाच कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही परिसरात उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून भरधाव वेगातील जीपने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सहा जण जागीच ठार झाले तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दहाच्या सुमारास घडली.बीड तालुक्यातील निवडुंगवाडी व तांदळ््याचीवाडी येथील मुंडे व तांदळे कुटुंबीय देवदर्शनासाठी जात होते. पाटोदा तालुक्यातील बेलखंडी पाटोदा व सौताडा येथे ते देवदर्शनासाठी जाणार होते अशी माहिती आहे. दरम्यान त्यांची जीप (क्र. एमएच २३ एएस ३४७०) वैद्यकिन्ही भागात आल्यानंतर एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रक (क्र. एमएच १२ एलटी ७०८६) ला पाठिमागून भरधाव वेगात धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की या जीपमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर, दवाखान्यात उपचारासाठी रुग्णालयात येत असताना दोघांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान या अपघातात चालक सतीश बभीमराव मुंडे व लहान मुलगी सई सतीश मुंडे हे जखमी आहेत. गंभीर जखमी असलेल्या सई हिला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे.हा अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना गाडीचा पत्रा कापून बाहेर काढले होते. यात जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान पाटोदा पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होते. पाटोदा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.मयतांची नावेया अपघातात जीपमधील वैजनाथ ज्ञानोबा तांदळे (४५), बाळू पंढरीनाथ मुंडे (४१), अशोक गबरु मुंडे (२८), केसरबाई बन्सी मुंडे (५६), आसराबाई भीमराव मुंडे (६०), शरद बन्सी मुंडे, जयश्री मुंडे व अल्पवयीन मुलगा सोहम सतीश मुंडे हे ८ जण ठार झाले आहेत.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू