शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

भगवानबाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:32 PM

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या भव्य दिव्य अशा स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांची जन्मभूमी असलेल्या सावरगांव घाट येथे मोठ्या थाटात संपन्न होत आहे.

ठळक मुद्देस्मारकाचे आज लोकार्पण : करवीरपीठ शंकराचार्यांसह अनेक संत, महंतांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या भव्य दिव्य अशा स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांची जन्मभूमी असलेल्या सावरगांव घाट येथे मोठ्या थाटात संपन्न होत आहे. करवीरपीठाचे शंकराचार्य श्रीमद् जगद्गुरु विद्या नृसिंह भारती यांच्यासह राज्यभरातून सुमारे तीसहून अधिक संत, महंत आणि भक्ती-शक्तीचा महापूर यावेळी लोटणार आहे. दरम्यान, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्या, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे तितक्याच जल्लोषात स्वागत करण्यासाठी अवघी जन्मभूमी सजली आहे.कार्यक्रमासाठी भव्य स्टेजकार्यक्रमाची सर्व जय्यत तयारी करण्यात आली असून ७० बाय ७० आकाराच्या भव्य व्यासपीठावर एका बाजूला संत, महंत आणि दुस-या बाजूला मंत्री, आमदार, खासदार व राजकीय क्षेत्रातील मंडळी राहतील. दसरा मेळाव्यासाठी राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मध्यप्रदेश यासह महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. ही गर्दी लक्षात घेवून वाहनांची पार्किंग व इतर व्यवस्था तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. जागोजागी अन्नछत्र, पिण्याच्या पाण्याची सोय स्वयंसेवकांनी केली आहे.जन्मभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीपालकमंत्री पंकजा मुंडे व करवीरपठाचे शंकराचार्य हे दोघेही उद्या वेगवेगळ्या हेलिकॉप्टरने सावरगांव घाट येथे येणार आहेत. त्यांच्यासाठी दोन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत.पंकजा मुंडे सकाळी साडेअकरा वाजता परळी येथून तर सकाळी दहा वाजता शंकराचार्य कोल्हापूर येथून निघणार आहेत. पंकजा यांच्या हेलिकॉप्टरमधून भगवानबाबांच्या मंदिरावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.दरम्यान, ठिकठिकाणी बॅनर, पोस्टर्स, घरासमोर रांगोळी, फुलांची आरास, औक्षण व मिरवणूक आदींनी पंकजा मुंडे व खा डॉ प्रीतम मुंडे यांचे स्वागत करण्यासाठी अवघी जन्मभूमी सजली आहे.खा. प्रीतम मुंडे येणार रॅलीनेदरवर्षी प्रमाणे दसरा मेळाव्यासाठी खासदार डॉ प्रीतम मुंडे ह्यांचे गोपीनाथगड ते सावरगांव घाट अशा भव्य रॅलीने आगमन होणार आहे. उद्या सकाळी सात वाजता गोपीनाथगडावरील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्या कार्यकर्त्यांना घेवून वाहनाने सावरगांवला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहेत.हे राहणार संत, महंत उपस्थितशंकराचार्य यांच्यासह संत तुकाराम महाराजांचे वंशज संभाजी महाराज मोरे(देहू) पैठणच्या नाथ महाराजांचे वंशज रघुनाथ बुवा पालखीवाले, नांदेडच्या गुरूद्वाराचे ज्ञानी सरबजितिसंगजी, आळंदी संस्थानचे राजाभाऊ चोपदार, बौध्द भिक्खू धम्म ज्योतीजी, महानुभव पंथाच्या सुभद्रा आत्या, अहमदपूरचे डॉ. शिविलंग शिवाचार्य महाराज, कपीलधारचे विरूपाक्ष महाराज, प्रसाद महाराज अंमळनेरकर, सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर, पोहरादेवीचे रामराव महाराज, शांतिगिरी महाराज वेरूळ, भास्कर गिरी महाराज देवगढ, विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड, शिवाजी महाराज नारायणगड, राधाताई सानप महासांगवी, त्रिविक्र मानंद सरस्वती पिंपळनेर, महादेव महाराज चाकरवाडी, रामदास महाराज सानप, प्रकाश बोधले महाराज, रामराव महाराज ढोक, अर्जून महाराज लाड, नवनाथ महाराज आंधळे, बुवा महाराज खाडे, यादवबाबा महाराज लोणी, परमेश्वर महाराज जायभाये, हरिहर महाराज दिवेगांवकर, सुदाम महाराज पानेगांवकर, प्रल्हाद महाराज विघ्ने, अर्जून महाराज खाडे

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रमPankaja Mundeपंकजा मुंडे