उष्णतेमुळे किटकनाशकाच्या बॉटलचा स्फोट होऊन गोदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:51 IST2019-05-17T16:51:09+5:302019-05-17T16:51:45+5:30
आगीत तांदळाची पोती जळून १ लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

उष्णतेमुळे किटकनाशकाच्या बॉटलचा स्फोट होऊन गोदामाला आग
परळी (बीड ) : तालुक्यातील दारावती तांडा रोडवर असलेल्या केसोना वेअर हाऊसच्या गोदामात शुक्रवारी (दि. १७ ) दुपारी 12 च्या सुमारास आग लागली. आगीत तांदळाची ५०० पोती जळून १ लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी गोदामातील कीटकनाशकाच्या बॉटलचा उष्णतेमुळे स्फोट झाला. यामुळे गोदामातील तांदळाच्या पोत्यास आग लागली. कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलास माहिती देऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केले. तोपर्यंत ५०० पोते जळून त्यातील तांदूळ जळाला. यात जवळपास १ लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.