Donation allocation begins Monday | अनुदानाची रक्कम वाटपास सोमवारपासून सुरुवात
अनुदानाची रक्कम वाटपास सोमवारपासून सुरुवात

ठळक मुद्देबीड जिल्हा प्रशासन घेणार प्रत्येक आठवड्याला वाटप रकमेचा अहवाल

बीड : जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी १४४ कोटी १८ लाख ८३ हजार रुपयांचा मदत निधी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरावर प्राप्त झाला आहे. हा निधी तात्काळ शेतक-यापर्यंत पोहचावा यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर पाठवला आहे. अनुदानाची रक्कम खात्यावर जमा करण्यास सोमवारपासून सुरुवात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना तात्काळ प्रक्रिया पूर्ण करुन खात्यावर पैसे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात जवळपास ८ लाख २४ हजार ७५९ शेतकरी अतिवृष्टीबाधित आहेत. मागील दोन वर्षांमध्ये पडलेला कोरडा दुष्काळ आणि त्यानंतर खरीप हंगामातील पिके काढणीच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून, आर्थिक अडचणीचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतक-यांना शासनाकडून नुकसान भरपाई अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी ५१४ कोटी ८१ लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १४४ कोटी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. त्याचे वितरण तालुकास्तरावर करण्यात आले असून, येथे बाधित शेतकºयांची यादी अंतिम करुन त्यांच्या खात्यावर सोमवारपासून अनुदान रक्कम वाटपास सुरुवात होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी सर्व संबंधित अधिकाºयांना तात्काळ शेतकºयांची अंतिम यादी तयार करुन त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
रक्कम बँकेत पडून राहिल्यास कारवाई
तहसीलदारांनी त्यांना वितरित रकमेचे वाटप झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी पूर्ण माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी. तसेच निधी वाटप न करता पडून राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
त्यानंतर देखील अनुदानाची रक्कम बँकेत ठेवल्याचे निदर्शनास आल्यास हा तात्पुरता अपहार समजून संबंधित अधिका-यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
अनेकवेळा लाभार्थ्याचे नाव, खाते क्रमांक जुळत नाही अशा तांत्रिक कारणास्तव परत आलेला निधी हा संबंधित शेतकºयाच्या खात्यावर जमा होणे आवश्यक आहे. असे न झाल्यास ती रक्कम शासनाकडे जमा व्हावी या संदर्भात दर आठवड्याला वाटप करण्यात आलेल्या रकमेचा ताळमेळ घेण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

Web Title: Donation allocation begins Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.