शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

डॉक्टरला खंडणी मागितली; न्यायालय आदेशाने गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:50 AM

सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने डॉ. यशवंत राजेभोसले यांच्या फिर्यादीवरून बाजीराव उर्फ बंडू खंडागळे (रा. मालीपारगाव) याच्या विरु द्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शासनाचे नियम डावलून सेवाभावी संस्था उभी केली, संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयाचे बांधकाम अनिधकृत असल्याची तक्रार मागे घेण्यासाठी सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने डॉ. यशवंत राजेभोसले यांच्या फिर्यादीवरून बाजीराव उर्फ बंडू खंडागळे (रा. मालीपारगाव) याच्या विरु द्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील डॉ. यशवंत राजेभोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रीतसर कागदपत्रांची पूर्तता करून गुरु कृपा सेवाभावी संस्था उभा केली. या संस्थेमार्फत मालीपारगाव शिवारात औषध निर्माण शास्त्र पदविका, पदवी महाविद्यालय चालविण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु असून ते नियमानुसार करण्यात येत आहे. असे असताना बाजीराव खंडागळे हा संस्था व बांधकाम अनधिकृत असल्याची धमकी देत आहे. माहिती अधिकारात माहिती मागून तुमच्या विरोधात तक्र ार करणार आहे. यासाठी मला सात लाख रुपये द्या, पैसे दिले नाही तर तुमच्याविरुद्ध अट्रोसिटीची केस करील अशी धमकी दिली. त्यामुळे डॉ. राजेभोसले यांनी बाजीराव खंडागळे विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. यामुळे डॉ. राजेभोसले यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी (२२ जानेवारी) बाजीराव खंडागळे विरुद्ध खंडणी मागणे, फसवणूक, खोट्या केसेसची धमकी दिल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे हे करीत आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर