बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 06:44 IST2025-04-28T06:43:10+5:302025-04-28T06:44:39+5:30

या प्रकरणात सीआयडीने तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखलही केले आहे. सध्या विष्णू चाटे वगळता सर्वच आरोपी हे बीडच्या कारागृहात आहेत. 

Dismissed PSI Kasle was transferred to Harsul; Karad and Kasle were in the same cell | बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते

बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड सध्या बीड कारागृहात आहे, तर बडतर्फ पाेलिस उपनिरीक्षक रणजित कासले हादेखील न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे दोघांनाही एकाच ठिकाणी ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे कारण देत कासले याला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले आहे. कासलेविराेधात ३ गुन्हे दाखल आहेत.

 या प्रकरणात सीआयडीने तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखलही केले आहे. सध्या विष्णू चाटे वगळता सर्वच आरोपी हे बीडच्या कारागृहात आहेत.  कराडवर बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने आरोप केले होते. त्यानंतर त्याला न्यायालयीन काेठडी झाली. कराडवर आरोप केलेले असल्याने कासलेला कारागृहात ठेवणे योग्य नसल्याचे कारण देत त्याला हर्सूलला पाठविण्यात आले आहे.

रणजीत कासले बडतर्फ, हवालदार अन् चालकही निलंबीत

 पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना महागडा आय टॅब दिला असा दावा करण्यासह अनेकांवर आरोप करणाऱ्या सायबर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले याला बडतर्फ केले. त्याच्यासोबत हवालदार आणि चालक असे दोघांचेही निलंबन झाले. एकाच ठाण्यातील तिघांवर गंभीर प्रकरणात कारवाई झाली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून बीड पोलिस वादात सापडले. या प्रकरणात अधिकारी निलंबीत झाले. त्यानंतरही अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी आरोपींना मदत करत राहिले. नवनीत काँवत यांनी पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यावर थोडा वचक राहिल, असे वाटत होते. परंतू या अपेक्षा फोल ठरत आहेत. कारण आजही पोलिस अधिकारी, कर्मचारी गैरप्रकार करतच असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Dismissed PSI Kasle was transferred to Harsul; Karad and Kasle were in the same cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.