शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST

बीड जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गाचे न्याय्य प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेऊन ८ वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सोडविले. उर्वरित प्रश्न ...

बीड जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गाचे न्याय्य प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेऊन ८ वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सोडविले. उर्वरित प्रश्न सोडविण्याची कार्यवाही सुरू आहे. असे असलेतरी कामबंद आंदोलन करण्याबाबत ग्रामसेवक संघटना भूमिका घेत आहेत तसेच परवानगीशिवाय निवेदन काढून प्रसारमाध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रसिद्धीमुळे जिल्हा परिषद प्रशासनाची प्रतीमा मलीन होत आहे. चुकीच्या मार्गाने प्रशासनावर दबाव टाकून जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमातील तरतुदींचे वारंवार उल्लंघन होत असल्याने ही नाटीस बजावली आहे. ग्रामसेवकांमध्ये प्रशासनविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी नोटीस संघटनेचे अध्यक्ष बळीराम उबाळे, राज्य उपाध्यक्ष मधुकर शेळके, जिल्हा सरचिटणीस भगवानराव तिडके यांना बजावण्यात आली आहे.

एखाद्या कर्मचारी अथवा अधिकाऱ्याला नोटीस बजावल्यानंतर नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार त्यास बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानुसार संबंधिताने वैयक्तिकरित्या खुलासा करून आपली भूमिका मांडणे अपेक्षित असते. मात्र, संघटनेच्या माध्यमातून प्रशासनच्या संभाव्य प्रक्रियेवर दबाव आणला जात असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

-----

११४ ग्रामपंचायतीमधील ४४७ जणांना नोटीस

केज पंचायत समितीमध्ये नरेगाबाबत जी चौकशी झाली त्यानुसार दोषी दिसून आलेले सरपंच, ग्रामसेवक, तांत्रिक अधिकारी, शाखा अभियंता, सहायक कार्यक्रम अधिकारी, ऑपरेटर, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी या सर्वांनाच नोटीस देऊन खुलासा मागितला आहे. ११४ ग्रामपंचायतींमधील ४७४ कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागितल्याचे जि. प. प्रशासनाने कळविले आहे.

-------

ग्रामसेवक संघटनेचे म्हणणे...

केज तालुक्यातील रोहयोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे नरेगा घोटाळा ग्रामसेवकांच्या माथी लादला आहे. मोजमापपुस्तिका,अंदाजपत्रक प्रत्यक्ष कामावर खर्च यांच्याशी नोटीसचा ताळमेळ लागत नाही. काही गावांमध्ये नरेगातून कुठलेही काम झाले नसताना ज्याचा खर्च शून्य आहे, अशा पण गावच्या ग्रामसेवकांना गुन्हा दाखल करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. अशा प्रकारच्या जाचास ग्रामसेवक वैतागले आहेत तसेच ग्रामसेवकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत असल्याने बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ जिल्हा शा‌‌खेने असहकार आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे.

------------

===Photopath===

060321\062_bed_19_06032021_14.jpg

===Caption===

जिल्हा परिषद