शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

APMC Election: परळीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व; पंकजा मुंडेंच्या पॅनलचे खातेही नाही उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 16:43 IST

भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनल उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला.

परळी ( बीड): कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने सर्व जागा जिंकत भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवला. वैद्यनाथ पॅनलने सर्व 18 जागा जिंकल्या. 

भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनल उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला. भाजपा पॅनलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. 28 एप्रिल रोजी बाजार समितीच्या संचालक पदाच्या 18 जागेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज येथील तहसिल कार्यालयात सकाळी सुरू करण्यात आली. मतमोजणी प्रक्रिया संथ गतीने सुरू होत असल्याने अंतिम निकालाला काही तास  विलंब झाला.परळीची कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या बारा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचे शनिवारी लागलेल्या निकालावरून बाजार समितीवर वर्चस्व निर्माण झाले आहे. भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनलला सर्वच जागेवर पराभव पत्करावा लागला. आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या  वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडविला आहे. 

हे उमेदवार झाले विजयीधनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार अशोक भानुदास डिघोळे, प्रभाकर आबाजी दहिफळे, दत्तात्रय त्रिंबकराव देशमुख, भाऊसाहेब वामनराव नायबळ, राजाभाऊ  पौळ, लक्ष्मण पौळ, रणजित विष्णुपंत सोळंके, भाग्यश्री संजय जाधव,  कमलाबाई फुलचंद फड, सूर्यभान  मुंडे, बळीराम कस्तुरे, राजाभाऊ गिराम, भगवानराव फड, राजाभाऊ जगताप, माऊली  गडदे, सुरेश मदनराव मुंडे, जयपाल लाहोटी आणि सुग्रीव गित्ते.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाBeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेAPMC Electionकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक