आष्टीत कोरोनाबाधित महिलेच्या मृतदेहाची अवहेलना; नगरपंचायत आणि ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 05:20 PM2020-11-07T17:20:17+5:302020-11-07T17:30:05+5:30

कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह २ तास अंत्यविधीशिवाय स्मशानभूमीत

Desecration of the deathbody of a woman with corona virus in Ashti; Nagar Panchayat and rural hospital administration point to each other | आष्टीत कोरोनाबाधित महिलेच्या मृतदेहाची अवहेलना; नगरपंचायत आणि ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

आष्टीत कोरोनाबाधित महिलेच्या मृतदेहाची अवहेलना; नगरपंचायत आणि ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

googlenewsNext
ठळक मुद्देसंतप्त नातेवाईकांनी मृतदेह नगर पंचायतच्या कार्यालयासमोर आणला. प्रशासनाकडून राञी उशीरा मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यात आले.

- नितीन कांबळे 

कडा : केरूळ येथील 65 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता आष्टी ग्रामिण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृतदेहावर नगर पंचायत प्रशासन व आरोग्य  विभागाच्या गलथान कारभारामुळे वेळीच अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. यामुळे संतप्त  नातेवाईकांनी राञी साडेआठ वाजता मृतदेह नगर पंचायतच्या कार्यालयासमोर आणला. यानंतर झोपलेले नगर पंचायत प्रशासन खडबडून जागे झाले,  प्रशासनाकडून राञी उशीरा मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील केरूळ येथील 65 वर्षीय महिलेची शुक्रवारी सायंकाळी प्रकृती बिघडली. त्यांना नातेवाईकांनी आष्टी ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालय प्रसासनाने त्यांची अॅटीजन चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर उपचारादरम्यान महिलेचा अर्ध्या तासानेच  मृत्यू झाला. मृतदेहावर अत्यंविधी करण्यासाठी ग्रामिण रुग्णालय प्रशासनाने नगरपंचायत प्रशासनाला कळविले. नातेवाईकांसह रुग्णालय प्रशासन मृतदेहाला घेऊन शहरातील पिंपळेश्वर स्मशानभूमीकडे सांयकाळी 6 च्या दरम्यान गेले. परंतु, येथे नगरपंचायतचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नव्हता. फक्त अत्यंविधीसाठी सरपण आणून टाकले होते. 

यानंतर नातेवाईक आणि डॉक्टर सुमारे दोन तास तेथे थांबले मात्र नगरपंचायतचे कोणीही इकडे फिरकेल नाही. यामुळे संतप्त नातेवाईकांनी रात्री ८. ३० वाजता मृतदेह नगरपंचायतच्या गेटवर आणला. या प्रकाराने प्रशासन खडबडून जागे झाले, पोलिस प्रशासनाचीही पळापळ झाली. प्रशासनाने रात्री उशीरा मृतदेहावर अत्यंसंस्कार केले.

नगरपंचायतीने सर्व व्यवस्था केली होती 
ग्रामीण रूग्णालयातील अधिकारी दरवेळी नगरपंचायतीकडे बोट दाखवतात. आमच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीसाठीची सर्व व्यवस्था केली होती. ग्रामीण रूग्णालयातून निरोप आला असता तर आम्ही कर्मचाऱ्यांना अंत्यविधीसाठी पाठवले असते. - निता अंधारे, मुख्याधिकारी

कोरोना बाधीत महिलेच्या मृतदेहावर अंत्यविधीसाठी नगरपंचायतीला पत्र दिले होते. त्यांनी व्यवस्था केली होती. पण तिथे कर्मचारी नसल्याने नातेवाईक संतप्त झाले. यामुळे घाबरून मृतदेह नगरपंचायत कार्यालयासमोर आणला. डॉ. राहुल टेकाडे, अधीक्षक 
 

Web Title: Desecration of the deathbody of a woman with corona virus in Ashti; Nagar Panchayat and rural hospital administration point to each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.