शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एकाच मोबाईलवरुन धनंजय मुंडे आणि छगन भूजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

By सोमनाथ खताळ | Updated: July 11, 2023 16:46 IST

परळीत गुन्हा दाखल, मुंडेंच्या कार्यालयात कॉल करून मागितली ५० लाख रूपयांची खंडणी. 

सोमनाथ खताळ बीड : शरद पवार यांना सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनासोबत युती केलेल्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुडे व छगन भूजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोघांनाही कॉल करणार मोबाईल क्रमांक एकच आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्याकडे ५० लाख रूपयांची खंडणीही मागण्यात आली आहे. याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर धमकी देणाऱ्या महाड येथील व्यक्तिला पुणे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राज्यात सध्या फुटीचे राजकारण सुरू आहे. आगोदर उद्धव ठाकरे यांच्यापासून एकनाथ शिंदे यांचा गट बाजूला झाला तर आता राष्टवादीत शरद पवार यांच्यापासून अजित पवार यांचा गट दुर झाला. शिवाय अजित पवारांचा गट भाजप व शिवसेना सरकारमध्ये सामील झाला. अजित पवारांना उपमुख्यमंत्री तर इतर ९ जणांना मंत्रीपदेही मिळाली. यातीलच धनंजय मुंडे व छगन भूजबळ यांना एका मोबाईल क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धनंजय मुंडे यांच्या परळीतील संपर्क कार्यालयात सोमवारी मध्यरात्री १२ वाजता हा कॉल आला. मी धनंजय मुंडे यांना जीवे मारणार असून मला सुपारी मिळाली आहे. मला ५० लाख रूपये द्या असे म्हणत समोरच्या व्यक्तीने खंडणी मागितली. त्यानंतर वाल्मीक कराड यांनी परळी शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी मोबाईल क्रमांकावर गुन्हा दाखल झाला आहे.

धमकी देणारा पुणे पोलिसांच्या ताब्यातभूजबळ आणि मुंडे यांना धमकी देणारा व्यक्ती हा महाड येथील आहे. त्याने दारूच्या नशेत हा प्रकार केल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. परंतू धमकीनंतर लगेच पुणे शहर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. तर परळीत गुन्हा दाखल होताच परळीचे पोलिसही पुण्यात पोहचले आहेत. तेथील कारवाईनंतर आरोपीला परळी शहर पोलिस ताब्यात घेणार असल्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप यांनी सांगितले. तसेच दोघांनाही ज्या क्रमांकावरून कॉल आले, तो एकच असल्याचेही सानप म्हणाले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेChhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीBeedबीड