परळी रेल्वे स्थानकात निजामाबाद-पंढरपुर रेल्वेत सापडला वृद्ध महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:59 IST2018-11-24T18:58:57+5:302018-11-24T18:59:24+5:30
निजामाबाद- पंढरपूर या पॅसेंजर रेल्वे गाडीमध्ये एका अनोळखी प्रवासी महिलेचा मृतदेह शुक्रवारी रात्री आढळून आला.

परळी रेल्वे स्थानकात निजामाबाद-पंढरपुर रेल्वेत सापडला वृद्ध महिलेचा मृतदेह
परळी (बीड ) : निजामाबाद- पंढरपूर या पॅसेंजर रेल्वे गाडीमध्ये एका अनोळखी प्रवासी महिलेचा मृतदेह शुक्रवारी रात्री आढळून आला. महिलेचे वय साधारण ६० वर्ष असून परळी रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.
परळी रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री ११.२५ वाजेच्या दरम्यान निजामाबाद- पंढरपूर पॅसेंजर रेल्वेत एका ६० वर्षीय अनोळखी प्रवासी महिलेचा मृतदेह आढळून आला. परळी रेल्वे पोलीसचे पोउपनि बालाजी गोणारकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेहाच्या अंगावर जांभळ्या रंगाचे नऊवारी लुगडे असून मजबूत शरीर बांधा आहे. या महिलेसंबंधी माहिती असल्यास परळी रेल्वे पोलिसांनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.