भरधाव जीप उलटून एक ठार, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:19 IST2019-06-08T00:19:13+5:302019-06-08T00:19:32+5:30
चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव जीप उलटल्याने एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे मांजरसुंबा - बीड रोडवर घडली.

भरधाव जीप उलटून एक ठार, दोन गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव जीप उलटल्याने एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे मांजरसुंबा - बीड रोडवर घडली.
विक्रांत भास्कर मोराळे (वय ३०, रा. बीड) असे मयताचे नाव आहे. विक्रांतसह आबेद शेख व अन्य एकजण हे मोराळे याच्या जीपने जेवणासाठी म्हणून मांजरसुंबा रोडवर गेले होते. पहाटे दोन वाजेच्या दरम्यान बीडकडे परत येत असताना हरियाणा ढाब्याच्या पुढे आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप उलटली. या अपघातात विक्रांतचा जागीच मृत्यू झाला तर आबेद शेख व अन्य एक गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मोराळे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात झाली. जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.