Beed: अंबाजोगाईत लग्नघरी धाडसी चोरी; रोकड, दागिन्यांसह ५० लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 12:15 PM2024-04-21T12:15:00+5:302024-04-21T12:15:22+5:30

Beed Crime News: अंबाजोगाई शहरालगत असलेल्या शेपवाडीत शनिवारी (दि.२०) रात्री चोरट्यांनी लग्नघरी कोणी नसल्याची संधी साधून रोख रक्कम आणि सोने असा ५० लाखापेक्षाही अधिक किमतीचा ऐवज लंपास केला.

Daredevil robbery at marriage house in Ambajogai; 50 lakhs in lieu of cash and jewellery | Beed: अंबाजोगाईत लग्नघरी धाडसी चोरी; रोकड, दागिन्यांसह ५० लाखांचा ऐवज लंपास

Beed: अंबाजोगाईत लग्नघरी धाडसी चोरी; रोकड, दागिन्यांसह ५० लाखांचा ऐवज लंपास

बीड - अंबाजोगाई शहरालगत असलेल्या शेपवाडीत शनिवारी (दि.२०) रात्री चोरट्यांनी लग्नघरी कोणी नसल्याची संधी साधून रोख रक्कम आणि सोने असा ५० लाखापेक्षाही अधिक किमतीचा ऐवज लंपास केला.

शेपवाडी येथील विष्णुपंत शेप यांच्या घरातील लग्नसोहळा दोन दिवसांवर आला आहे. यासाठी त्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घरामध्ये आणून ठेवली होती. शनिवारी सायंकाळी घरातील सर्व सदस्य दुसऱ्या एका लग्न समारंभासाठी गेले होते. त्यामुळे घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि ३३ लाख रुपये रोख व २५ तोळे सोन्याचे दागिने असा ५० लाखांपेक्षाही अधिक रकमेचा ऐवज लंपास केला. शेप कुटुंबीय लग्नाहून परतल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने पोहोचून पंचनामा केला आणि श्वान पथकाला पाचारण केले. या घटममुळे परीसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Daredevil robbery at marriage house in Ambajogai; 50 lakhs in lieu of cash and jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.