तीनशे रुपयांच्या हिशोबासाठी पत्नीचा ठेचून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 04:19 IST2019-08-01T04:19:11+5:302019-08-01T04:19:16+5:30

अंबाजोगाई ( बीड ) : सातेफळ शिवारातील वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजूर जोडप्यांमध्ये मंगळवारी रात्री केवळ ३०० रुपयांच्या खर्चाचा ...

The crushed murder of his wife for a reckoning of three hundred rupees | तीनशे रुपयांच्या हिशोबासाठी पत्नीचा ठेचून खून

तीनशे रुपयांच्या हिशोबासाठी पत्नीचा ठेचून खून

अंबाजोगाई (बीड) : सातेफळ शिवारातील वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजूर जोडप्यांमध्ये मंगळवारी रात्री केवळ ३०० रुपयांच्या खर्चाचा हिशोब देण्यावरून वाद झाला. त्यानंतर अशोक गुलाब नरसिंगे याने पाच महिन्यांच्या चिमुरड्या लेकीसमोरच पत्नी दिपालीला विटांनी ठेचून मारले.

पंधरा दिवसापूर्वी अशोकने बाजार करण्यासाठी दिपालीला तीनशे रुपये दिले होते. परराज्यात पलायनाच्या तयारीत असलेल्या अशोकला पोलिसांनी चार तासांत उस्मानाबाद जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या.

Web Title: The crushed murder of his wife for a reckoning of three hundred rupees