राष्ट्रसंत भगवानबाबा स्मारक लोकार्पण सोहळ्यास अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 12:25 IST2018-10-18T12:22:13+5:302018-10-18T12:25:57+5:30

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या भव्य दिव्य अशा स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांची जन्मभूमी असलेल्या सावरगांव घाट येथे मोठ्या थाटात संपन्न होत आहे. 

Crowd gathered at sawargaon for inauguration of Rashtrasaint Bhagwanbaba memorial | राष्ट्रसंत भगवानबाबा स्मारक लोकार्पण सोहळ्यास अलोट गर्दी

राष्ट्रसंत भगवानबाबा स्मारक लोकार्पण सोहळ्यास अलोट गर्दी

बीड : राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या भव्य दिव्य अशा स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांची जन्मभूमी असलेल्या सावरगांव घाट येथे मोठ्या थाटात संपन्न होत आहे. 

करवीरपीठाचे शंकराचार्य श्रीमद् जगद्गुरु  विद्या नृसिंह भारती यांच्यासह राज्यभरातून सुमारे तीसहून अधिक संत, महंत उपस्थित राहणार आहेत. भक्ती-शक्तीचा महापूर यावेळी लोटणार आहे. दरम्यान, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्या, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे तितक्याच जल्लोषात स्वागत करण्यासाठी अवघी जन्मभूमी सजली आहे. 

गोपीनाथगडावरील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन खासदार डॉ प्रीतम मुंडे ह्यांची ही गोपीनाथगड ते सावरगांव घाट रॅली दसरा मेळाव्यासाठी सकाळीच निघाली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेवून खा. प्रितम मुंडे असंख्य कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह रवाना झाल्या.

Web Title: Crowd gathered at sawargaon for inauguration of Rashtrasaint Bhagwanbaba memorial