शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यानंतर गव्याची एंट्री; आष्टी तालुक्यातील कऱ्हेवडगाव परिसरात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 15:58 IST

वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गव्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

ठळक मुद्देपाऊलखुणांची चाचपणी केली असून गवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.या परिसरात प्रथमच गव्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

- अविनाश कदम 

आष्टी : तालुक्यामध्ये बिबट्याच्या दहशतीने शेतक-यांनी शेतातील उभे पिक सोडून दिले होते. शेतक-यांमध्ये प्रचंड प्रमाणात भिती निर्माण झाली होती. ही भिती संपते तोच आता सुगीच्या दिवसांमध्ये क-हेवडगांव येथील टकले वस्ती शेजारील शेतामध्ये शेतकऱ्यांना गव्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभाग घटनास्थळी दाखल झाले असून याभागात विशेष लक्ष ठेवून आहे.

तालुक्यातील क-हेवडगांव येथील शेतकरी राम नागरगोजे,अंबादास बांगर,जालिंदर नागरगोजे,विजय विधाते हे शेतातून रविवार दि.२८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या दरम्यान ज्वारी काढून परतत असताना टकले वस्तीजवळील भागिनाथ टकले यांच्या शेतात असलेल्या कपाशी मध्ये अचानक मोठा प्राणी समोर दिसला प्रचंड घाबरलेल्या परिस्थितीत त्यांनी कधी न पाहिलेला प्राणी दिसल्याने गाडीवरून तीघे असल्याने लांबून त्यांनी गाडीच्या उजेडात मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले असून हे व्हिडिओ वनविभागाला पाठवले असून घटनास्थळी वनविभागाचे पथक रवाना झाले आहे. या भागात विषेश लक्ष ठेवून आहे.

गव्याच्या पाऊलखुणांची चाचपणी केली असून गवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.गव्याचा शोध घेण्याचे वनविभागाचे काम सुरू आहे. या परिसरात प्रथमच गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी वनरक्षक मातावळी एन.के.काकडे,वनरक्षक आष्टी डी.जे.चव्हाण,चालक बी.डी.टाफरे दाखल झाले असून गव्याला ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.

वनविभागाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोटासाठी अन्न शोधत असलेला गवा आता मानव वस्तीमध्ये शिरला असून गव्याचे दर्शन झाल्यानंतर नागरिकांनी एकत्र जमून मागे न लागता गोगांटा टाळावा गव्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे वनविभागाची गाडी पेट्रोलिंग करेल अधिकारी घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.पाळीव प्राण्यांसह नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी - शाम सिरसाठ ( वन परिक्षेत्र अधिकारी आष्टी ) 

ग्रामस्थांमध्ये भीतीजंगली गव्यांचे दर्शन आम्हाला जवळून झाले आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी शेजारील तालुका असलेल्या जामखेड येथील वंजारवाडीचे शेतकरी संतोष दराडे यांना गव्याने हल्ल्यात जखमी केले आहे. वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करून या ठिकाणी रात्रीची गस्त वाढवण्यात यावी.- राम नागरगोजे, शेतकरी

टॅग्स :forest departmentवनविभागBeedबीड