शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांचे धाडस वाढले; ताब्यातील टिप्पर पळवून नेऊन महसूल पथकावर घातली गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 15:21 IST

एका जीपमधून (एमएच 23 एडी-5990) वाळूमाफिया आले आणि त्यांनी जबरदस्तीने टिप्पर पळवून नेले.

गेवराई : अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पाडळसिंगी टोलनाका परिसरात पकडला. यावेळी टिप्पर मालकाने मंडळाधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन टिप्पर पळून नेल्याची घटना शुक्रवार रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदार सचिन खाडे व इतर कर्मचारी पाडळसिंगी टोलनाका येथे वाळू वाहतुकीचा परवाना चेक करत होते. त्यानंतर काही कामानिमित्त तहसीलदार गेवराईला गेले व पावत्या चेक करणे सुरू ठेवा असे येथे उपस्थित असलेल्या मंडळ अधिकारी व तलाठी यांना सांगितले. यावेळी तिथे  वाळूने भरलेला एक टिप्पर (एमएच 23 डब्लू -4299) आला. त्यास अडवून मंडळ अधिकारी व तलाठी यांनी चालकाकडे पावतीची चौकशी केली. चालकाने तारीख संपलेली पावती दाखवली. त्यामुळे मंडळ अधिकारी व तलाठी टिप्परवर कारवाई करत होते. 

दरम्यान, तिथे एका जीपमधून (एमएच 23 एडी-5990) वाळूमाफिया आले आणि त्यांनी जबरदस्तीने टिप्पर पळवून नेले. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी गाडीतून टिप्परचा पाठलाग केला. यावेळी शेख जुनैद चाँद व चालकाने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गाडीला धडक दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी अमोल सुधाकर कुरुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड