coronavirus : आनंदवार्ता ! धनंजय मुंडेंचे पीए, चालकासह पाच जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:01 IST2020-06-20T16:01:15+5:302020-06-20T16:01:58+5:30

बीड जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७७ झाली आहे.

coronavirus: Relief ! five corona free including Dhananjay Munde's PA, driver | coronavirus : आनंदवार्ता ! धनंजय मुंडेंचे पीए, चालकासह पाच जण कोरोनामुक्त

coronavirus : आनंदवार्ता ! धनंजय मुंडेंचे पीए, चालकासह पाच जण कोरोनामुक्त

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनाही दोन दिवसात सुटी मिळण्याची माहिती

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहायक, वाहन चालक व इतर तिघांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७७ झाली आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक, वाहन चालक व इतर पाच जण मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. पैकी चालक व सहायकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच बीड शहरातील मसरत नगर भागातील तिघांना सुटी दिली आहे. दोन दिवसांत पाच जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे एकूण ९८ बाधितांपैकी ७७ जण कोरोनामुक्त झालेले आहेत. चौघांचा मृत्यू झाला आहे. 

पालकमंत्र्यांनाही दोन दिवसात सुटी
पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यामुळे त्यांना येत्या दोन दिवसात रुग्णालयातून सुटी दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत.

Web Title: coronavirus: Relief ! five corona free including Dhananjay Munde's PA, driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.