मालकाला हैदराबादला सोडून बीडमध्ये परतलेला चालक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 09:02 PM2020-06-07T21:02:09+5:302020-06-07T21:03:24+5:30

बीडची कोरोना रुग्णसंख्या ७०

Coronavirus : The driver who left Hyderabad after droping owner and returned to Beed is positive | मालकाला हैदराबादला सोडून बीडमध्ये परतलेला चालक पॉझिटिव्ह

मालकाला हैदराबादला सोडून बीडमध्ये परतलेला चालक पॉझिटिव्ह

googlenewsNext

बीड : हॉटेल मालकाला घेऊन हैदराबादला गेलेला एक चालक बीडमध्ये परत आल्यावर कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. या एका रुग्णासह आता बीड जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ७० झाली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० झाली आहे. पैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर ५७ कोरोनामुक्त झालेले आहेत. सध्या बीड जिल्ह्यात ११ तर औरंगाबादेत १ अशा १२ जणांवर उपचार सुरू आहेत. रविवारी जिल्ह्यातून ७५ स्वॅब घेतले होते. यात ७४ निगेटिव्ह आले तर बीड शहरातील झमझम कॉलनीतील रहिवाशी असलेला एक ६१ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला.

हा व्यक्ती खाजगी वाहनाचा चालक आहे. बीड शहरातील एका हॉटेल मालकासह तिघांना घेऊन तो हैदराबाद येथे गेला होता. ३ जून रोजी तो परत आला. बीडमध्ये येताच त्याला क्वारंटाईन करण्यात आले. परंतू खोकला येत असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात आणून  स्वॅब घेण्यात आला. रविवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता त्याच्या संपर्कातील इतर लोकांचा शोध घेणे सुरू असून त्यांचाही स्वॅब घेणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: Coronavirus : The driver who left Hyderabad after droping owner and returned to Beed is positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.