कोरोना संकटातही क्षुल्लक कारणावरून दोन गट आपसात भिडले; अकरा जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 18:30 IST2020-04-17T18:29:52+5:302020-04-17T18:30:59+5:30
पोलीस पाहताच पळून जाण्याचा केला प्रयत्न

कोरोना संकटातही क्षुल्लक कारणावरून दोन गट आपसात भिडले; अकरा जणांवर गुन्हा दाखल
माजलगाव : तालुक्यातील हिवरा येथे सार्वजनिक रस्त्यावर भांडणे करत असल्याची खबर मिळाल्यावरुन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रानावनात पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या 11 जणांना ग्रामीण पोलीसांनी पकडून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
हिवरा येथे शुक्रवारी किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद सुरु झाला. रस्त्यावर येत दोन्ही गटातील पंधरा ते वीस जण एकमेकांना शिवीगाळ करु लागले. याची माहिती पोलीसांना झाल्यानंतर त्यांनी गावात धाव घेतली. पोलीसाची गाडी पाहताच शेतात पळणाऱ्या अनिल कोकाटे, कृष्णा तौर, राधेशाम कोकाटे, प्रतिक कोकाटे, पंकज कोकाटे, विलास माने, उत्तम देशमुख, विष्णू आवघडे, सोनेराव आवघडे, नामदेव आवघडे, पवन आवघडे, नामदेव आवघडे यांना पोलीसांनी ताब्यात घेवून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे बेकादेशीर जमाव जमवल्या प्रकरणी ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला . ही कारवाई स.पो,नि.विशाल इधाटे, पोउपनि अनुसया माने, सफौ.शेख खदीर, पोह.एच.एम.राठोड, पोना.डि.वाय.मोरे, पोकॉ.गोविंद बाबरे यांनी केली.