शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

जयदत्तअण्णांना विजयी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:43 PM

स्व.गोपीनाथराव मुंडेंनी असंख्य लोकांना गुलाल लावण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचे सभेत आवाहन : आमदारांच्या वज्रमुठीमुळेच विकास, राष्टÑवादीवर केली कडाडून टीका

बीड : मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कारभार केला नाही तर संसार केला. बीड जिल्ह्यातील आमदारांची एकमूठ वज्रमूठ होती म्हणून बीड जिल्ह्याचा विकास झाला. राष्ट्रवादी चांगल्या माणसाला संपवण्याचे काम करते हा इतिहास आहे. या इतिहासाची उजळणी करूनच नेते आणि पदाधिकारी स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीचे लोक भाजपा-शिवसेनेत येत आहेत. स्व.गोपीनाथराव मुंडेंनी असंख्य लोकांना गुलाल लावण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.रायमोहा येथे बीड मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांची गुरुवारी जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या.पंकजा मुंडे म्हणाल्या, आ.सुरेश धस यांना भाजपात घेतले आणि तेथून पुढे मेगा भरतीला सुरूवात झाली आता आमचा पक्ष हाऊसफुल्ल झाला आहे. गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्याचा विकास करताना मतभेद केला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब जगताप, संगिता चव्हाण, डॉ.योगेश क्षीरसागर, सर्जेराव तांदळे, दशरथ वनवे, राजेंद्र मस्के, मुन्ना फड, बाळासाहेब अंबुरे, बप्पासाहेब घुगे, नितीन धांडे, सागर बहीर, रोहीत क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, गणपत डोईफोडे, अरूण बोंगाणे, गणेश उगले, वसंत सानप, हनुमान पिंगळे, जगदीश काळे, जयश्री मुंडे, मधुसूदन खेडकर, भारत सोन्नर, सतीश सुरवसे, राजेंद्र बांगर, संपदा गडकरी, प्रकाश खेडकर, परमेश्वर सातपुते, गणेश उगले इत्यादींची उपस्थिती होती.कार्यकर्ता केंद्रस्थानीबीड जिल्ह्यातील कार्यकर्ता हा मला केंद्रस्थानी आहे. घरचे लोक मला सोडून गेले, अडचणीच्या काळात तेव्हा कार्यकर्ता फाटके कपडे घालून काम करत होता. त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न मी करत आहे. जिल्ह्यात सहाही आमदार महायुतीचे निवडून आले पाहिजेत, बीडमधून जयदत्त क्षीरसागरांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, आम्ही सर्व युती म्हणून एका दिशेने जाणार आहोत. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. आमच्या पंखाला बळ देताना विजयाची जोड लावा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडPankaja Mundeपंकजा मुंडेJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर