शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

काँग्रेसचे 'मोदी' राष्ट्रवादीत; बीड जिल्ह्यात कॉंग्रेस जिंवत ठेवणाऱ्या राजकिशोर मोदींच्या हाती घड्याळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 1:32 PM

Rajkishore Modi: स्वकर्तृत्वावर अंबाजोगाई नगर परिषद २५ वर्षापासून आपल्या ताब्यात ठेवणारे राजकिशोर मोदी यांनी गेल्या ४० वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात आपले राजकीय वलय निर्माण केले आहे.

ठळक मुद्देमातब्बर नेते राजकिशोर मोदी यांचा कॉंग्रेसला धक्का 

अंबाजोगाई : अंबाजोगाईचे नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते राजकिशोर मोदी ( Rajkishor Modi ) यांनी आपल्या  समर्थकांसह गुरुवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) , उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) , पालकमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

अंबाजोगाईचे नगराध्यक्ष तथा बीड जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी  काँग्रेस  पक्षाला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्वकर्तृत्वावर अंबाजोगाई नगर परिषद २५ वर्षापासून आपल्या ताब्यात ठेवणारे राजकिशोर मोदी यांनी गेल्या ४० वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात आपले राजकीय वलय निर्माण केले आहे ( Rajkishore Modi, who kept the Congress alive in Beed district is joins NCP) . सहकार, शिक्षण, सांस्कृतिक, समाजकारणाच्या माध्यमातून त्यांची ओळख सर्वदूर झाली आहे. काँग्रेस पक्षात मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, कॉटन फेडरेशन व काँग्रेस पक्षातील विविध पदांवर त्यांनी काम केलेले आहे. महाविद्यालयीन जीवनापासून ते काँग्रेस पक्षात कार्यरत होते. बीड जिल्ह्याची काँग्रेस  जिवंत ठेवण्याचे काम मोदीनी केले होते. मात्र, पक्षातील अंतर्गत गटबाजीला वैतागून त्यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला. 

राष्ट्रवादीला स्थानिक स्वराज्य संस्थेत होणार फायदा गेल्या ४० वर्षापासून राजकारणात काम करणाऱ्या मोदींना विधान परिषदेची संधी दोन वेळा उपलब्ध झाली होती. मात्र, दोन्ही वेळा ही संधी हुकली.आगामी काळात काँगेस पक्षात राहून भवितव्य नसल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. मोदी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने आगामी नगरपालिकेच्या निवडणुका, बाजार समिती व सहकारातील विविध निवडणुका  राष्ट्रवादीला जमेची बाजु ठरणार आहेत. अंबाजोगाई तालुक्यात राष्ट्रवादीचे  तुल्यबळ नेतृत्व  नव्हते. ती उणीव मोदींच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. तसेच मोदींच्या माध्यमातून एक नवा चेहरा पक्षाला मिळाला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीडAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडे