शक्तिप्रदर्शन करीत भरले उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:11 IST2019-10-04T00:10:21+5:302019-10-04T00:11:08+5:30
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदार संघात गुरुवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रमुख राजकीय पक्षासह अपक्षांचीही भाऊगर्दी झाली. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. बीड मतदार संघातून शिवसेनेच्या वतीने जयदत्त क्षीरसागर यांच्यासह सहा उमेदवारांनी अर्ज भरले.

शक्तिप्रदर्शन करीत भरले उमेदवारी अर्ज
बीड : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदार संघात गुरुवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रमुख राजकीय पक्षासह अपक्षांचीही भाऊगर्दी झाली. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे.
बीड मतदार संघातून शिवसेनेच्या वतीने जयदत्त क्षीरसागर यांच्यासह सहा उमेदवारांनी अर्ज भरले.
परळीतून भाजपच्या पंकजा मुंडे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यासह १५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंकजा मुंडे यांच्या रॅलीला वाजत गाजत सुरवात झाली. लक्ष्मीबाई टॉवर चौकात जाहीर सभा झाली. उमेदवारी दाखल केल्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर धनंजय मुंडे यांनी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी परळी शहरातून रॅली काढल्यानंतर प्रचार सभा झाली.
आष्टी मतदार संघातून रामदास सूर्यभान खाडे, अमोल रामदास तरटे, रवींद्र नवनाथ ढोबळे, भिमराव आनंदराव धोंडे, साहेबराव नाथुजी दरेकर, जयदत्त सुरेश धस यांनी उमेदवारी दाखल केली.
केज मतदारसंघात गुरुवारी भाजपच्या नमिता मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे, जयश्री साठे, विलास काळूंके, अॅड. राहुल मस्के, जयश्री साठे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.
गेवराईतून राष्टÑवादी कॉँग्रेसचे विजयसिंह पंडित, अमरसिंह पंडित, अपक्ष बदामराव पंडित यांच्यासह २२ जणांनी उमेदवारी दाखल केली.
माजलगाव मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रकाश सोळंके यांच्यासह १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.