वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने युवकाला बोलावले; आधी रिचवली दारू, नंतर पेट्रोलने पेटविले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 12:25 PM2021-09-25T12:25:53+5:302021-09-25T12:26:31+5:30

माजलगाव तालुक्यातील नाकलगाव  येथील कृष्णा अर्जुन गायकवाड (१९) यास   आदिनाथ सुधाकर गायकवाड (रा. मंगरुळ पीर क्र. २) याने भ्रमणध्वनी करून वाढदिवस साजरा करायचा आहे, असे सांगून गावाबाहेर बोलावले, नंतर एका पांढऱ्या  गाडीमध्ये बसवले.

Called the youth under the pretext of celebrating a birthday; then ignited by petrol | वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने युवकाला बोलावले; आधी रिचवली दारू, नंतर पेट्रोलने पेटविले

वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने युवकाला बोलावले; आधी रिचवली दारू, नंतर पेट्रोलने पेटविले

Next

बीड: वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने युवकाला बोलावून जीपमध्ये घालून धारुर घाटात पेट्रोल ओतून पेटविल्याची थरारक घटना २१ सप्टेेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली होती. यातील जखमीची मृत्यूशी झुंज  सुरू असून मुख्य आरोपीला गुरुवारी रात्री उशिरा बेड्या ठोकण्यात दिंद्रूड पोलिसांना यश आले. या प्रकरणाचे गूढ अद्याप उलगडलेले नसले तरी दारूच्या तर्र नशेत आरोपींनी त्यास पेटविल्याची माहिती तपासात समोर आली आहे.  

माजलगाव तालुक्यातील नाकलगाव  येथील कृष्णा अर्जुन गायकवाड (१९) यास   आदिनाथ सुधाकर गायकवाड (रा. मंगरुळ पीर क्र. २) याने भ्रमणध्वनी करून वाढदिवस साजरा करायचा आहे, असे सांगून गावाबाहेर बोलावले, नंतर एका पांढऱ्या  गाडीमध्ये बसवले. आदिनाथसह अन्य तीन अनोळखी तरुणांनी कृष्णा यास मारहाण करत पोत्यात टाकून थेट धारूर घाटात आणून त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. यापूर्वी त्यांनी घटनास्थळी यथेच्छ दारू रिचवली होती. तर्रर्र नशेत त्यांनी हे कृत्य केल्याची बाब पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आली आहे. 
 

 

Web Title: Called the youth under the pretext of celebrating a birthday; then ignited by petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app