केज-कळंब महामार्गांवर धावत्या बसला आग; ३ महिला जखमी, २२ प्रवाशी बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:04 IST2025-06-09T19:04:39+5:302025-06-09T19:04:48+5:30

चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवत प्रवाशांनी तात्काळ खाली उतरण्यास सांगितले.

Bus catches fire on Kaij-Kalamb highway; 3 women injured, 22 passengers escape unharmed | केज-कळंब महामार्गांवर धावत्या बसला आग; ३ महिला जखमी, २२ प्रवाशी बालंबाल बचावले

केज-कळंब महामार्गांवर धावत्या बसला आग; ३ महिला जखमी, २२ प्रवाशी बालंबाल बचावले

- मधुकर सिरसट
केज :
केज येथून कळंबकडे जाणाऱ्या धावत्या बसने आज, सोमवारी ( दि. ९ )  दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान अचानक पेट घेतला. प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाल्यामुळे झालेल्या चेंगाराचेंगरीत 3 वृद्ध महिला प्रवाशी किरकोळ जखमी झाल्या. तर चालकाच्या प्रसंगावधाणामुळे 22 प्रवाशी बालंबल बचावले आहेत.

कळंब बस आगाराची बस ( एम एच 11/ बी एल 9374 ) केज येथून दुपारी 3:20 वाजण्याच्या दरम्यान २२ प्रवाशांना घेऊन कळंबकडे निघाली. बोबडेवाडी शिवारात चालकाच्या समोरच्या बाजूने बसने पेट घेतल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवत प्रवाशांनी तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. बसमध्ये आग लागल्याचे समजताच सर्व प्रवाशांच्यात बाहेर पडण्यासाठी एकच झुंबड उडाली. दरम्यान, या गोंधळात वयोवृद्ध 3 महिला किरकोळ जखमी झाल्या. केज व कळंब येथील अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. काहीवेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

आरटीओच्या नावाने संताप..
परिवहन अधिकाऱ्यांनी खाजगी वाहने तपासताना बसचीही नियमित तपासणी करावी. प्रवासास अयोग्य बसेसला रस्त्यावर येण्यासाठी बंदी घालावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. 

बसचालकाची पोलिसात धाव
याप्रकरणी चालक अनिल बारकूल यांच्या तक्रारीवरून केज पोलिसात नोंद करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार निर्मला जाधव यांनी दिली.

Web Title: Bus catches fire on Kaij-Kalamb highway; 3 women injured, 22 passengers escape unharmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.