भरधाव बसने दुचाकीला उडवले; दुचाकीस्वार वकील जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 12:37 IST2019-12-12T12:35:20+5:302019-12-12T12:37:59+5:30
गेवराई न्यायालयातील वकिली जागीच ठार

भरधाव बसने दुचाकीला उडवले; दुचाकीस्वार वकील जागीच ठार
गेवराई : भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार वकील जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पाढंरवाडी फाट्या जवळील घडली. धर्मराज कल्याणराव चव्हाण (३७ ) असे मृत वकिलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, माटेगाव येथील वकील धर्मराज चव्हाण हे गेवराई न्यायालयात वकिली करत. आज सकाळी चव्हाण आपल्या दुचाकीवर ( क्रमांक एम.एच.23 पी. 2013 ) माटेगाववरून गेवराईकडे येत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील पाढंरवाडी फाट्याजवळ समोर येणाऱ्या बसने ( क्रमांक एम.एच 14 बी.टी 1576 ) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेले चव्हाण जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई,वडिल, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.