बीएससीचे शिक्षण घेणाऱ्या तरूणीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 17:32 IST2019-06-05T17:31:23+5:302019-06-05T17:32:36+5:30
आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

बीएससीचे शिक्षण घेणाऱ्या तरूणीने घेतला गळफास
कडा (बीड ) : बीएससीचे शिक्षण घेणाऱ्या तरूणीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथै बुधवारी दुपारी उघडकीस आली.
करीश्मा रमेश बुचुडे (२१ रा.डोंगरगन) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. करीश्मा ही कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत होती. सध्या सुट्ट्या असल्याने ती घरीच होती. बुधवारी दुपारी घरातील सदस्य बाहेर गेल्याची संधी साधून तीने राहत्या घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेत आत्महत्या केली. ती कोठे दिसेना आणि घराचा दरवाजा बंद दिसल्याने कुटूंबियांना संशय आला. त्यांनी दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणाची अंभोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.