सेवानिवृत्त सैनिकाच्या घरी भरदिवसा चोरी; २२ तोळे सोन्यासह ३ लाखांची रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 18:46 IST2022-07-30T18:45:42+5:302022-07-30T18:46:03+5:30

आष्टी तालुक्यातील कडा डोईठाण रोडवर असलेल्या सांगवी पाटण येथील घटना

Broad Day Burglary at Retired Soldier's Home; 3 lakhs in cash along with 22 tolas of gold | सेवानिवृत्त सैनिकाच्या घरी भरदिवसा चोरी; २२ तोळे सोन्यासह ३ लाखांची रोकड लंपास

सेवानिवृत्त सैनिकाच्या घरी भरदिवसा चोरी; २२ तोळे सोन्यासह ३ लाखांची रोकड लंपास

- नितीन कांबळे 
कडा (बीड) :
सेवानिवृत्त सैनिक पत्नीसह शेतात गेल्याचे आणि आजी-नातू कामानिमित्त घराला कुलूप लावून गेल्याची संधी साधत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केल्याची खळबळजनक घटना सांगवी पाटण येथे घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी कपाटातील २२ तोळे सोन्यासह रोख ३ लाख रूपये लंपास केले आहेत. 

आष्टी तालुक्यातील कडा डोईठाण रोडवर असलेल्या सांगवी पाटण येथे सेवानिवृत्त सैनिक संदिप भिमराव खिलारे हे पत्नीसह शेतात पिकाची खुरपणी करण्यासाठी गेले होते. तर घरी थांबलेले आजी-नातू घराला कुलूप लावून गावात गेले होते. आजीनातू घरी येताच त्यांना धक्काच बसला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केल्याचे त्यांना दिसले. आत पाहणी केली असता कपाट तोडून त्यातील २२ तोळे सोन्यासह रोख ३ लाख रूपये असा ऐवज लंपास झाला होता. 

माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजेद्र पवार, पोलिस अंमलदार बंडु दुधाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पुढील तपास करत असून परिसरात भरदिवसा चोरीच्या घटना वाढल्याने तपासाचे आव्हान आहे. 

Web Title: Broad Day Burglary at Retired Soldier's Home; 3 lakhs in cash along with 22 tolas of gold