धनंजय मुंडेंच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीपूर्वी बॉम्बची अफवा; खोडसाळपणा करणारा अद्याप मोकळाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 05:49 PM2022-01-06T17:49:15+5:302022-01-06T17:49:59+5:30

पालकमंत्री धनंजय मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारी बैठक होती, तेव्हाच पोलिसांना आला निनावी फोन

Bomb rumors ahead of meeting at Dhananjay Munde's Collector's office; The perpetrator is still free | धनंजय मुंडेंच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीपूर्वी बॉम्बची अफवा; खोडसाळपणा करणारा अद्याप मोकळाच

धनंजय मुंडेंच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीपूर्वी बॉम्बची अफवा; खोडसाळपणा करणारा अद्याप मोकळाच

Next

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याचा फोन अप्पर अधीक्षक कार्यालयात केल्याने मंगळवारी एकच खळबळ उडाली होती. याला २४ तास उलटूनही फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध लावण्यात यंत्रणेला यश आलेले नाही.

मंगळवारी पालकमंत्री धनंजय मुंडेबीड शहरात होते. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी सकाळी साडेअकरा वाजता बीडच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील दूरध्वनीवर एक निनावी फोन आला. तो पोलीस अंमलदार रुपाली नाटकर यांनी उचलला. समोरील व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब आहे, एवढेच सांगितले.

नाटकर यांनी नाव विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने फोन ठेवून दिला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बशोधक व नाशक पथकाने झाडाझडती घेतली. तब्बल तीन तास शोधमोहीम राबविली, परंतु कोठेही काहीही आढळून आले नाही.पोलीस अंमलदार रुपाली नाटकर यांच्या तक्रारीवरून लोकसेवकास चुकीची माहिती कळविल्याप्रकरणी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Bomb rumors ahead of meeting at Dhananjay Munde's Collector's office; The perpetrator is still free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.