अंबाजोगाईत बँकेच्या आवारातील विहिरीत मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:30 AM2021-01-21T04:30:50+5:302021-01-21T04:30:50+5:30

येथील महाराष्ट्र बँकेच्या आवारात जुनी विहीर आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत ही विहीर वापरात होती. नंतर तिचा वापर बंद आहे. बुधवारी ...

A body was found in a well in the bank premises in Ambajogai | अंबाजोगाईत बँकेच्या आवारातील विहिरीत मृतदेह आढळला

अंबाजोगाईत बँकेच्या आवारातील विहिरीत मृतदेह आढळला

googlenewsNext

येथील महाराष्ट्र बँकेच्या आवारात जुनी विहीर आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत ही विहीर वापरात होती. नंतर तिचा वापर बंद आहे. बुधवारी सकाळी बँकेचे दैनंदिन काम सुरु झाल्यानंतर ११ वाजेच्या सुमारास सुरक्षा रक्षकांना दुर्गंधी पसरलेल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पहिले असता पालथ्या अवस्थेत तरंगत असलेला मृतदेह दिसून आला. बँकेच्या व्यवस्थापकांकडून याबाबत खबर मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रकाश सोळंके आणि घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून मृतदेह काढण्यासाठी नगर पालिकेशी पत्रव्यवहार करूनही सहकार्य न मिळाल्याने सायंकाळी साडेपाच वाजता सोळंके आणि घुगे यांनीच पुढाकार घेत काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला आणि स्वारातीच्या शवगृहात पाठवून दिला. मृतदेह पुरुष जातीचा असून त्याचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षाच्या दरम्यान आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

नगर पालिकेच्या असहकार्यामुळे मृतदेहाची अवहेलना

मृतदेह काढण्यासाठी मनुष्यबळ पुरवावे असे पत्र पोलिसांनी नगर पालिकेला दिले होते. चार तास उलटूनही नगर पालिकेने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे हवालदार सोळंके, घुगे यांनी सामाजिक कार्यकर्ते शेख मुख्तार आणि इतरांच्या मदतीने पुढाकार घेत दोरी, पलंग आणला. बोलाविलेल्या खाजगी क्रेनच्या साह्याने पलंगावर बसून ते विहिरीत उतरले आणि मृतदेह वर काढला. तोपर्यंत नगर पालिकेचा एकही कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. पोलीस कर्मचारी विहिरीत असताना ‘आम्ही मनुष्यबळ पुरवू शकत नसल्याचे’ स्वच्छता निरीक्षकाचे पत्र घेऊन न.प.चा कर्मचारी आला होता. मुख्याधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे मृतदेहाची नाहक विटंबना झाली.

Web Title: A body was found in a well in the bank premises in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.