खडकत जामखेड रोडवर आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:12 IST2019-02-09T00:12:47+5:302019-02-09T00:12:52+5:30

आष्टी तालुक्यातील खडकत परिसरात शुक्र वारी सकाळी पुरूष जातीचे बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

The body of the saddle found on the rocky Jamkhed Road | खडकत जामखेड रोडवर आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

खडकत जामखेड रोडवर आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

ठळक मुद्देआष्टी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

कडा : आष्टी तालुक्यातील खडकत परिसरात शुक्र वारी सकाळी पुरूष जातीचे बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आष्टी तालुक्यातील खडकत शिवारातील खडकत जामखेड रोडवर पोत्यात बांधलेला मृतदेह ंअसल्याची माहिती ठाणे अंमलदार यांना समजताच ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले पंचनामा करून मृतदेह अंबाजोगाई येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मृतदेहाच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असून हा खून झाला असल्याने पुरावा नष्ट करायचा म्हणून अज्ञात आरोपींनी हा मृतदेह पोत्यात बांधून खटकत जामखेड रोडवर टाकला होता. सरकारतर्फे पोलीस नाईक अशोक केदार यांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा आष्टी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश गोडसे करीत आहेत.
चिठ्ठी सापडली
मयताच्या खिशात एक अर्धवट फाटलेली चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील कोतवाल येथील गुºहाळ चालवणाऱ्या एकाचे नाव असून, तीन मोबाईल क्रमांक लिहिलेले आढळून आले आहे. याचा तपास पोलीस करत आहेत. मयत अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Web Title: The body of the saddle found on the rocky Jamkhed Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.