धारुर कृषीउत्पन्न बाजार समितीवर १८ पैक्की १७ जागा जिंकत भाजपाचा झेंडा, राष्ट्रवादीला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 04:31 PM2022-12-16T16:31:38+5:302022-12-16T16:31:58+5:30

भाजपच्या रमेश आडसकर व राजाभाऊ मुंडे यांचा राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांना "हबाडा"

BJP flag again on Dharur Agricultural Produce Market Committee | धारुर कृषीउत्पन्न बाजार समितीवर १८ पैक्की १७ जागा जिंकत भाजपाचा झेंडा, राष्ट्रवादीला धक्का

धारुर कृषीउत्पन्न बाजार समितीवर १८ पैक्की १७ जागा जिंकत भाजपाचा झेंडा, राष्ट्रवादीला धक्का

googlenewsNext

किल्ले धारुर (बीड): धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा भाजपाचा झेंडा फडकला आहे. भाजपाचे नेते रमेशराव आडसकर व ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांना "हबाडा" दिला आहे. १८ जागांपैक्की तब्बल १७ जागेवर विजय मिळवत भाजपाने कृषी उत्पन्न बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. 

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत १८ जागांपैकी एक जागा भाजपाची बिनविरोध निवडून आली होती. यानंतर १७ जागांसाठी निवडणुकीत भाजपने मोठे यश संपादन केले. १७ पैक्की तब्बल १६ जागांवर भाजपने वर्चस्व मिळवत एकहाती सत्ता मिळवली.  निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील ११, ग्रामपंचायतचे ४ संचालक भाजपचेच निवडून आले. व्यापारी मतदारसंघात एक जागा भाजप, एक जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. केवळ एका जागेवर राष्ट्रवादीला यश आले. प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा सुपडा साफ केल्याचे पाहायला मिळाले. 

निवडणुकीसाठी भाजपकडून रमेशराव आडसकर व राजाभाऊ मुंडे यांनी संपूर्ण यंत्रणा हातात घेतली होती. तर राष्ट्रवादीकडून आ. प्रकाश सोळंके, जयसिंग सोळंके यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतु त्यांना अपयश आले. निकाल लागताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. 

विजयी उमेदवार: 
सेवा सहकारी सोसायटीचा मतदारसंघ (सर्वसाधारण)

 १)जाधव बालासाहेब रामराव
२)तिडके जयदेव रघुनाथ
३) तोंडे मंगेश महादेव
४)धुमाळ दामोधर बाबुराव
५) मायकर शिवाजी बन्सी
६) शिनगारे सुनिल लक्ष्मण
७)सोळंके भारत नारायण

सेवा सहकारी सोसायटीचा मतदारसंघ(महिला)
८)गव्हाणे सुनिताबाई पंढरी
९)तिडके कमल अर्जुन

सेवा सहकारी सोसायटीचा मतदारसंघ.
(विमुक्त जाती / जमाती व भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग)
१०) बडे सदाशिव महादेव

सेवा सहकारी सोसायटीचा मतदारसंघ(इमाव)
११) विठ्ठल गोरे (बिनविरोध)

ग्रामपंचायत मतदार संघ (सर्व साधारण)
१२) भांगे चंद्रकांत नरहरी
१३) साखरे धनंजय संपतराव

ग्रामपंचायत मतदार संघ (अनु.जाती / जमाती)
१४) कचरे रमेश नामदेव

ग्रामपंचायत मतदार संघ (आर्थिक दृष्टय दुर्बल घटक)
१५) मोरे शितल लक्ष्मण

व्यापारी व आडते मतदार संघ.
१६)दरेकर अशोक सुंदरराव (राष्ट्रवादी)
१७)शिनगारे संदीप मधुकर

हमाल व तोलारी मतदार संघ
१८)कांदे वचिष्ट बप्पाजी

Web Title: BJP flag again on Dharur Agricultural Produce Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.