भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ बीडला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:31 IST2018-03-29T01:31:25+5:302018-03-29T01:31:25+5:30

श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर केलेले आरोप व गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी राज्यभर सन्मान मोर्चा व पदयात्रा कढण्यात आली होती. बीड शहरातही श्री शिव प्रतिष्ठान व विविध हिंदुत्ववादी संघटनेने सन्मानमोर्चा व पदयात्रा काढली.

Bidla Morcha in support of Bhide Guruji | भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ बीडला मोर्चा

भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ बीडला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर केलेले आरोप व गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी राज्यभर सन्मान मोर्चा व पदयात्रा कढण्यात आली होती. बीड शहरातही श्री शिव प्रतिष्ठान व विविध हिंदुत्ववादी संघटनेने सन्मानमोर्चा व पदयात्रा काढली.

भीमा - कोरेगाव प्रकरणानंतर संभाजी भिडे यांच्यावर राज्यभर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांना अटक करण्याची मागणी काही संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र संभाजी भिडे यांच्यावर केलेले आरोप हे खोटे असून, त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान व इतर संघटनांच्या वतीने करण्यात आली. बीड शहरातही बुधवारी पदयात्रा निघाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली पदयात्रा नगररोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेली. येथे मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. पदयात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले.

Web Title: Bidla Morcha in support of Bhide Guruji