माजलगावात भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:18 IST2019-02-25T00:18:21+5:302019-02-25T00:18:50+5:30
शहरातील बँक कॉलनी भागात रविवारी दुपारी सोने चांदीचे व्यापारी मंचक थोरात यांचे घरी कोणी नसल्याचे पाहून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यामध्ये दागिन्यांसह रोख १३ हजार रूपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला.

माजलगावात भरदिवसा घरफोडी
माजलगाव : शहरातील बँक कॉलनी भागात रविवारी दुपारी सोने चांदीचे व्यापारी मंचक थोरात यांचे घरी कोणी नसल्याचे पाहून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यामध्ये दागिन्यांसह रोख १३ हजार रूपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला.
शहरातील बँक कॉलनी भागात मंजरथ रोडजवळ सोने चांदीचे व्यापारी मंचक थोरात यांचे घर आहे.
रविवारी ते आपल्या नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दुपारी घरात प्रवेश केला व सामानाची उलथापालथ करून कपाटातील सोने ६ ग्रॅम, चांदी २०० ग्रॅम व रोख १३ हजाराची रक्कम लंपास केली. थोरात हे बाहेरगावाहून परत आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला.