बीडच्या लेकीचा रुबाब! जिद्दीने पोलीस झाली, अन् आनंदात चक्क दिव्यांग पित्याला खांद्यावर उचललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:47 IST2026-04-09T12:46:20+5:302026-04-09T12:47:29+5:30

बीडच्या लेकीची मुंबई पोलीस दलात भरती; दिव्यांग वडिलांना खांद्यावर घेऊन साजरा केला जल्लोष.

Beed's Sumaiya Sheikh Joins Mumbai Railway Police; Carries Disabled Father on Shoulders to Celebrate. | बीडच्या लेकीचा रुबाब! जिद्दीने पोलीस झाली, अन् आनंदात चक्क दिव्यांग पित्याला खांद्यावर उचललं

बीडच्या लेकीचा रुबाब! जिद्दीने पोलीस झाली, अन् आनंदात चक्क दिव्यांग पित्याला खांद्यावर उचललं

दिंद्रुड (जि. बीड): जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य करता येते, हे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील सुमय्या शरीफ शेख हिने सिद्ध केले आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही, दोन वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर सुमय्याची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात निवड झाली आहे. या नियुक्तीनंतर तिने आपल्या दिव्यांग वडिलांना खांद्यावर घेऊन जो आनंदोत्सव साजरा केला, त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अपयशाने खचली नाही, नव्या दमाने उभारी
सुमैया ही एका अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी अकॅडमीमध्ये तिने दोन वर्षे कसून सराव केला. मागील पोलीस भरतीमध्ये केवळ दोन गुणांनी तिची संधी हुकली होती, मात्र ती खचली नाही. तिने पुन्हा नव्याने सराव सुरू ठेवला आणि यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या मुंबई लोहमार्ग चाचणी परीक्षेत 'ईडब्ल्यूएस' (EWS) प्रवर्गातून यश मिळवले. तिच्या या यशाने शेख परिवाराच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले आहेत.

वडिलांचे ऋण फेडणारा तो भावनिक क्षण
बुधवारी (८ एप्रिल) दिंद्रुड ग्रामस्थांच्या वतीने सुमय्याचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर सुमय्याने आपले वडील शरीफ शेख, जे दिव्यांग आहेत, त्यांना आपल्या खांद्यावर उचलून घेतले. "वडिलांनी माझ्यासाठी जे कष्ट घेतले, त्याचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही," अशी भावना तिने यावेळी व्यक्त केली. एका मुलीने आपल्या वडिलांप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता पाहून उपस्थित गावकऱ्यांचेही डोळे पाणावले.

Web Title : बीड की बेटी: पुलिस अधिकारी ने विकलांग पिता को कंधे पर उठाया, मनाई सफलता।

Web Summary : बीड की सुमैया शेख, कठिनाइयों को पार कर, मुंबई रेलवे पुलिस अधिकारी बनीं। अपनी सफलता का जश्न मनाते हुए, उन्होंने अपने विकलांग पिता को अपने कंधों पर उठाया, एक कृतज्ञतापूर्ण क्षण जो वायरल हो गया। पिछली असफलताओं को दूर करने के बाद उनकी उपलब्धि ने उनके परिवार और समुदाय को खुशी दी।

Web Title : Beed's Daughter: Police Officer Carries Disabled Father, Celebrates Success.

Web Summary : Sumayya Shaikh from Beed, overcoming hardship, became a Mumbai Railway Police officer. Celebrating her success, she lifted her disabled father onto her shoulders, a moment of gratitude that went viral. Her achievement, after overcoming previous setbacks, brought joy to her family and community.