शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

बीड पोलीस अधीक्षकांचा दणका; २२ सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 17:28 IST

गुन्हे करण्याच्या सवयीच्या लोकांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपारीच्या कारवाईचे पोलीस अधीक्षकांना अधिकार आहेत.

ठळक मुद्देचोऱ्या, घरफोड्यांतील आरोपींसह उपद्रवींचा समावेश

बीड : चोऱ्या, घरफोड्यांसह मारामारीच्या आठ गुन्ह्यांतील २२ सराईत आरोपींना पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी अखेर हद्दपारीचा दणका दिला. या आदेशाने जिल्ह्याच्या गुन्हे वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गुन्हे करण्याच्या सवयीच्या लोकांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपारीच्या कारवाईचे पोलीस अधीक्षकांना अधिकार आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या आठ प्रकरणांतील २२ आरोपींची पांगापांग करण्यासाठी तसेच त्यांच्या गुन्हेगारीस चाप लावण्यासाठी हद्दपार करण्यात आले. तत्पूर्वी ठाणेप्रमुखांकडून प्राप्त प्रस्तावांवर सुनावणी घेण्यात आली. काही जणांना महिनाभरासाठी तर काही जणांना तीन ते सहा महिन्यांसाठी तालुक्यातून व नजीकच्या तालुक्यातून हद्दपार करण्यात आले.

गुन्हेगारी कृत्यांना आळा बसेल जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी हद्दपारीच्या कारवाया करण्यात आल्या. यातून गुन्हेगारी कृत्यांना आळा बसेल असा विश्वास आहे. आगामी पोळा, गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर या कारवाया केल्या आहेत.- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड

या आरोपींचा समावेश...- धारुर ठाण्यांतर्गत भास्कर ज्ञानोबा फुंदे, विलास ज्ञानोबा फुंदे, श्रीकांत प्रभाकर फुंदे (सर्व रा.उमराई ता.अंबाजोगाई) यांना धारुर, केज, वडवणी, अंबाजोगाई या तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले. - अंमळनेर ठाणे हद्दीतील आबा मल्हारी सूळ, दादासाहेब आबा सुळ, बालासाहेब बबन सूळ (सर्व रा.खोपटी ता.शिरुर) यांना शिरुर, आष्टी, पाटोदा या तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले- संतोष गोरख खोटे, बापूराव साहेबराव खोटे, सुधाकर साहेबराव खोटे, युवराज ज्ञानदेव खोटे (सर्व रा.मुगगाव ता.पाटोदा) यांना पाटोदा, आष्टी, शिरुर तालुक्यांतून हद्दपार केले. - चकलांबा ठाणे हद्दीतील जालिंदर सर्जेराव येवले, विशाल जालिंदर येवले, (दोघे रा.पाथरवाला खु. ता.गेवराई) यांना गेवराई तालुक्यातून हद्दपार करण्यात आले. - बर्दापूर ठाणे हद्दीतील सिद्धेश्वर बालाजी दराडे, महादेव बालाजी दराडे (दोघे रा.दरडवाडी ता.अंबाजोगाई) यांना अंबाजोगाई तालुक्यातून तडिपार केले. - पिंपळनेर ठाणे हद्दीतून हरिदास मनोहर जगताप, प्रताप हरिदास जगताप, अमोल हरिदास जगताप (सर्व रा.भवानवाडी ता.बीड) यांना बीड व वडवणी तालुक्यातून हद्दपार केले गेले. - गेवराई ठाणे हद्दीतील संतोष हनुमान धनगर (रा.गोपाळवस्ती, बेलगाव ता.गेवराई) व भागवत सखाराम पवार (रा.नागझरी ता.गेवराई) यांना गेवराई तालुक्यातून हद्दपार केले गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस