Beed : Seven Death in Road accident | ट्रक आणि बोलेरोमध्ये भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू 
ट्रक आणि बोलेरोमध्ये भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू 

बीड - बीडमधील मांजरसुंबा ते पाटोदा रोडवर ट्रक आणि बोलेरो जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात जीपमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. 

बोलेरो गाडीने  भरधाव वेगात येत उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. त्यात सात जणांचा मृत्यू झाला. मयतांमध्ये दोन महिलांसह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. देवदर्शन घेण्यासाठी बीड तालुक्यातील बेलखंडी पाटोदा येथे हे सर्वजण जात होते. यादरम्यान वैद्यकिन्ही जवळ हा भीषण अपघात झाला.  यात वैजिनाथ ज्ञानोबा तांदळे, केसरबाई बन्सी मुंडे, बाळू पंढरीनाथ मुंडे, अशोक मुंडे,आसराबाई भीमराव मुंडे व अन्य दोन हे जागीच ठार झाले आहेत. चालक मात्र या अपघातातून बचावला आहे. नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात हलवले तसेच घटनास्थळी पाटोदा पोलिसांनी धाव घेतली आहे.

Web Title: Beed : Seven Death in Road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.