Beed: धानोऱ्यात शेतातील जुगार अड्ड्यावर धाड; अंभोरा पोलिसांची आठवड्यात तिसरी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:52 IST2025-09-02T12:52:14+5:302025-09-02T12:52:47+5:30

आठवड्यात तिसरा जुगार अड्डा उद्ध्वस्त! 

Beed: Raid on a gambling den in a field in Dhanora; Ambhora police's third action in a week | Beed: धानोऱ्यात शेतातील जुगार अड्ड्यावर धाड; अंभोरा पोलिसांची आठवड्यात तिसरी कारवाई

Beed: धानोऱ्यात शेतातील जुगार अड्ड्यावर धाड; अंभोरा पोलिसांची आठवड्यात तिसरी कारवाई

- नितीन कांबळे
कडा:
धानोरा येथील एका शेतातील जुगार अड्ड्यावर अंभोरा पोलिसांनी सोमवारी रात्री धाड टाकली. यावेळी पोलिसांनी साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करत १३ जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, अंभोरा पोलिसांची ठाणे हद्दीतील जुगार अड्ड्यावर आठवड्यातील तिसरी कारवाई आहे. 

आष्टी तालुक्यातील धानोरा येथे एका शेतात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचून शेतातील अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी १३ जुगारींना ताब्यात घेऊन मोबाईल, दुचाकी, जुगारीचे साहित्य असा एकूण ४ लाख ३० हजार ९३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, आदिनाथ भडके, देवीदास सातव यांनी केली.

यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिस अंमलदार सतीश पैठणे यांच्या फिर्यादीवरून संतोष शिवाजी शेळके, मनोजकुमार मनोहर माने, गंगाराम बाबू फुलमाळी, लक्ष्मण त्रिंबक शेळके ( रा.धानोरा), आजिनाथ रामभाऊ गायकवाड, सुलेमान देवळा, प्रकाश रमेश ढोबळे, रामकिशन पंढरीनाथ भोसले ( दोघे रा.शेरी खुर्द), नागाआप्पा बंडीवडर भिमाप्पा ( रा.वरचगल, कर्नाटक) यांच्यासह अन्य पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवड्यात तीन ठिकाणी धाड
धामणगांव: ८ लाख ८० हजार, १२ जणांविरुद्ध गुन्हा
कोल्होवाडी : ५ लाख ६४ हजार १५० रूपये, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
धानोरा: ४ लाख ३० हजार ९३० रूपये, १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Web Title: Beed: Raid on a gambling den in a field in Dhanora; Ambhora police's third action in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.