शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

मस्साजोगमध्ये उलटफेर; जाणून घ्या अश्विनी देशमुख, स्वरूपानंद देशमुखांना किती मते पडली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 20:04 IST

मस्साजोगचा निकाल: ९ मतांची जुनी कसर भरून काढत स्वरूपानंद देशमुख झाले सरपंच; राज्याचे लक्ष लागलेली लढत संपली

- मधुकर सिरसटकेज (जि. बीड): दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर १५ महिन्यांनी रिक्त झालेल्या मस्साजोग सरपंचपदासाठी मंगळवारी २८ एप्रिल रोजी मतदान पार पडले. बुधवारी सकाळी केज येथील तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत स्वरूपानंद देशमुख यांनी ९१४ मते मिळवत विजय संपादन केला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या अश्विनी संतोष देशमुख यांना ८२२ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष करंजवणकर यांनी स्वरूपानंद देशमुख यांना ९२ मतांनी विजयी घोषित केले.

बिनविरोधचे प्रयत्न का फसले?अश्विनी देशमुख यांची निवड बिनविरोध व्हावी अशी ग्रामस्थांची इच्छा होती. मात्र, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मागील निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याकडून अवघ्या ९ मतांनी पराभूत झालेल्या स्वरूपानंद यांनी या पोटनिवडणुकीत आपली महत्त्वाकांक्षा सिद्ध केली.

मतदानाची आकडेवारी आणि निकालगावातील एकूण २,०८४ मतदारांपैकी १,७४४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता (८३.६९ टक्के). यामध्ये ९३९ पुरुष आणि ८०५ महिला मतदारांचा समावेश होता. मतमोजणीसाठी तहसील कार्यालयात तीन टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रक्रियेवेळी तहसीलदार अशोक भंडारे आणि पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात होता.

न्यायासाठी संतोष देशमुख कुटुंबासोबतच राहणार: स्वरूपानंद देशमुखविजयानंतर पत्रकारांशी बोलताना स्वरूपानंद देशमुख यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. "मी परळीतून पैसे आणले, असा खालच्या पातळीचा आरोप माझ्यावर झाला, पण मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी यापुढेही त्यांच्या कुटुंबासोबत कायम राहीन," असे भावनिक आवाहन नवनिर्वाचित सरपंचांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Massajog Election Upset: Deshmukh vs. Deshmukh, Who Won?

Web Summary : In Massajog, Swarupanand Deshmukh won the Sarpanch election with 914 votes, defeating Ashwini Deshmukh who secured 822. The election followed the death of the previous Sarpanch. Deshmukh pledged justice for the late Sarpanch's family.
टॅग्स :BeedबीडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण