बीड पोलिसांनी शहरासह पुण्यात दुचाकी चोरणारा चोरटा केला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:00 IST2019-02-05T11:58:56+5:302019-02-05T12:00:24+5:30

त्याचा एक साथीदार अद्यापही फरार आहे.

Beed police arrest a bicycle theft who stole bikes from pune along with the city | बीड पोलिसांनी शहरासह पुण्यात दुचाकी चोरणारा चोरटा केला गजाआड

बीड पोलिसांनी शहरासह पुण्यात दुचाकी चोरणारा चोरटा केला गजाआड

ठळक मुद्देपुण्यातील दुचाकी बीडला आणून विक्री केल्यास्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाची कारवाई

बीड : बीडसह पुण्यात दुचाकी चोरून त्या विक्री करणाऱ्या एका चोरट्याच्या बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून चार दुचाकीही जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाने केली.

शहाजी पुरी (२८ रा.खांडे पारगाव ता.बीड) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. शहाजी हा मागील दोन वर्षांपासून दुचाकी चोरीकडे वळला. पुण्यात काही दिवस राहिला. तेथील काही दुचाकी बीडला आणून विक्री केल्या. तसेच बीडमधीलही दुचाकी चोरून त्या ग्रामीण भागात विक्री केल्या. हीच माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे सापळा लावला. सोमवारी रात्री त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याचा एक साथीदार अद्यापही फरार असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळू असा विश्वास बीड पोलिसांनी व्यक्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सपोनि अमोल धस, नसीर श्ेख, साजीद पठाण, सखाराम पवार, राजु वंजारे, विशेष पथकाचे पोउपनि रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, अंकुश वरपे, गणेश नवले, रेवननाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली.

Web Title: Beed police arrest a bicycle theft who stole bikes from pune along with the city