शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बीड जिल्हा रूग्णालयात प्रसूतीच्या नव्हे, ‘खंडणी’ लुटीच्या ‘कळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:17 IST

‘आम्ही तुमचे बाळांतपण केले’, ‘तुम्हाला सर्व मदत केली’, ‘आमच्याशिवाय तुम्हाला कोणीच नाही’, ‘तुमच्या घरात वंशाचा दिवा जन्माला आला, ५०० रूपये द्या’, ‘तुमच्या घरात महालक्ष्मी जन्माला आली, ३०० रूपये द्या’ असे म्हणत जिल्हा रूग्णालयात दायींकडून महिला रूग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याची धक्कादायक माहिती शनिवारी एका तक्रारीतून समोर आली आहे. जिल्हा रूग्णालयात येणारे रूग्ण अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. अशातच लूट होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वॉर्ड क्रमांक दोन व तीनमध्ये सध्या प्रसुतीचा कमी आणि आर्थिक लुटीचा अधिक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीमुळे जिल्हा रूग्णालयाची प्रतिमा मलीन होत चालली असून, रूग्णालयात येणाऱ्यांची संख्या रोडावत असल्याचे दिसते.

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘आम्ही तुमचे बाळांतपण केले’, ‘तुम्हाला सर्व मदत केली’, ‘आमच्याशिवाय तुम्हाला कोणीच नाही’, ‘तुमच्या घरात वंशाचा दिवा जन्माला आला, ५०० रूपये द्या’, ‘तुमच्या घरात महालक्ष्मी जन्माला आली, ३०० रूपये द्या’ असे म्हणत जिल्हा रूग्णालयात दायींकडून महिला रूग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याची धक्कादायक माहिती शनिवारी एका तक्रारीतून समोर आली आहे. जिल्हा रूग्णालयात येणारे रूग्ण अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. अशातच लूट होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वॉर्ड क्रमांक दोन व तीनमध्ये सध्या प्रसुतीचा कमी आणि आर्थिक लुटीचा अधिक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीमुळे जिल्हा रूग्णालयाची प्रतिमा मलीन होत चालली असून, रूग्णालयात येणाऱ्यांची संख्या रोडावत असल्याचे दिसते.

मागील काही महिन्यांपासून जिल्हा रूग्णालयाचा कारभार बºयापैकी सुधारला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडून डॉक्टर, परिचारिका व दायींना वेळोवेळी सूचना करून चांगली सुविधा देण्याचे आदेश दिले जातात. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयातही अचानक भेटी देऊन कारभार बºयापैकी सुधारला. परंतु काही त्रुटी दूर करण्यात डॉ. थोरात यांना अद्यापही यश आले नसल्याचे दिसून येते. जिल्हा रूग्णालयात आपले अधिकारी, कर्मचारी काय करतात? कोठे जातात? रूग्णांना कशी सुविधा देतात? याचा आढावा घेण्यात ते कमी पडत आहेत.

याचाच फायदा घेऊन रूग्णालयातील काही अधिकारी, कर्मचारी रूग्णांची आर्थिक लूट करण्याबरोबरच त्यांना वेळेवर आणि दर्जेदार सुविधा देण्यास कामचुकारपणा करीत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम जिल्हा रूग्णालयाच्या प्रतिमेवर होत असून, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांंमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.रूग्णांकडून पैसे घेणाºया कर्मचाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरू लागली आहे.नियंत्रणाचा अभावजिल्हा रूग्णालयात रिक्त जागा आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु उपलब्ध अधिकाºयांनी तरी अशा बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ रोज सकाळी फेरफटका मारल्याने वचक राहत नाही. रूग्णांशी संवाद साधला तर ते त्यांच्या अडचणी मांडतील. परंतु असे करण्यास वरिष्ठ अधिकारी टाळाटाळ करतात. याचाच फायदा हे लुटारू कर्मचारी घेत आहेत. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्यामुळेच रूग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे.

वसुलीला लगाम नाहीएकीकडे जिल्हा रूग्णालयासह जिल्ह्यातील सर्वच रूग्णालयांचा कारभार सुधारण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात प्रयत्न करीत आहेत. महिला प्रसुती, दर्जेदार व वेळेवर सुविधा, डॉक्टर, कर्मचाºयांनी वेळेवर हजर राहणे, अशा अनेक कामांत सुधारणा केली. परंतु रूग्णालयातील वसुलीला मात्र त्यांना अद्याप लगाम लावता आलेला नाही.

महिन्यापूर्वीची घटना ताजीमहिन्यापूर्वीच वडवणी तालुक्यातील एक महिला प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. पहाटे चार वाजेच्या सुमारास ती प्रसुत झाली. तिला वॉर्डमध्ये आणल्यानंतर येथील दायींनी तिच्यासोबत असलेल्या नातेवाईकांकडे ५०० रूपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच, त्यांना अरेरावी केली. सकाळी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तात्काळ पाऊले उचलली आणि संबंधित दायींवर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर काही दिवस येथील आर्थिक लूट थांबली होती. आता पुन्हा तीच परिस्थिती सुरू झाल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.

गर्भवती महिलांसोबत अरेरावीचे वर्तनअगोदरच प्रसुतीच्या वेदनांनी गर्भवती महिला त्रस्त असतात. त्यात पुन्हा येथील काही कर्मचाºयांकडून त्यांना अरेरावी होते. यामुळे त्यांची मानसिकता बिघडते. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेसोबत असलेल्या नातेवाईकांशीही अरेरावी होत असल्याचे समोर आले आहे.

यापूर्वी तक्रार आली होतीयापूर्वी देखील अशी तक्रार आली होती, हे खरे आहे. त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई केली होती. आता पुन्हा ही तक्रार आली आहे. हा प्रकार गंभीर आहे, हे मान्य आहे. सदरील दाईवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल. एवढेच नव्हे तर कार्यालयात सर्वत्र बोर्ड लावले जातील. रूग्णांनी कोणालाही पैसे देऊ नयेत. रूग्णालयात असे प्रकार होत असतील तर खपवून घेतले जाणार नाहीत. यामध्ये कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. थेट कारवाई केली जाईल. आता मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालतो.- डॉ. अशोक थोरातजिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडHealthआरोग्यWomenमहिलाMarathwadaमराठवाडा