सरपंचांची 'बोगस' सही! केजमध्ये टेंडर प्रक्रियेत मोठी फसवणूक; महिला सरपंचाची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 20:06 IST2026-02-24T20:06:23+5:302026-02-24T20:06:50+5:30

केजमध्ये महिला सरपंचाचा आक्रमक पवित्रा; दोषींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी

Beed News: Fake Signature of Sarpanch on Tender Documents in Kaij; Woman Sarpanch Files Complaint | सरपंचांची 'बोगस' सही! केजमध्ये टेंडर प्रक्रियेत मोठी फसवणूक; महिला सरपंचाची पोलिसांत धाव

सरपंचांची 'बोगस' सही! केजमध्ये टेंडर प्रक्रियेत मोठी फसवणूक; महिला सरपंचाची पोलिसांत धाव

 

- मधुकर सिरसट 
केज (बीड):
तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) ग्रामपंचायतीमध्ये निविदा प्रक्रियेसाठी चक्क महिला सरपंचाची बोगस सही करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरपंचांना कोणतीही कल्पना न देता करण्यात आलेल्या या बनावटगिरीमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सरपंच डॉ. अनिता शशिकांत गदळे यांनी पोलीस निरीक्षकांकडे दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नेमका प्रकार काय?
दहिफळ (वड) ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डी.पी.डी.सी. निधीतून शाळा खोलीचे बांधकाम मंजूर झाले होते. या कामाच्या निविदा प्रक्रियेसाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता प्रिती हरिदास तांबडे (रा. शिरूर घाट) यांनी कागदपत्रे सादर केली. मात्र, या प्रक्रियेत सरपंचांना विश्वासात न घेता चक्क त्यांच्या स्वाक्षरीची तोतयेगिरी करून निविदा राबवण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

महिला सरपंचाचा आक्रमक पवित्रा
आपल्या अधिकारांवर गदा आणून शासकीय निधीचा गैरवापर करण्याच्या उद्देशानेच ही फसवणूक करण्यात आली असल्याचे सरपंच डॉ. अनिता गदळे यांनी म्हटले आहे. त्यांनी आ. नमिता मुंदडा, जिल्हाधिकारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. बोगस सही करणारी व्यक्ती आणि त्यांना भाग पाडणारे सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याने बोगसगिरी करणाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत.

Web Title : सरपंच के जाली हस्ताक्षर: निविदा में धोखाधड़ी, पुलिस में शिकायत।

Web Summary : दहिफल की सरपंच को पता चला कि स्कूल निर्माण के लिए निविदा प्रक्रिया के दौरान उनके हस्ताक्षर जाली थे। उन्होंने धोखाधड़ी और सरकारी धन के दुरुपयोग का आरोप लगाया है, पुलिस जांच और जालसाजी के लिए जिम्मेदार लोगों के खिलाफ कार्रवाई की मांग की है।

Web Title : Sarpanch's forged signature: Tender fraud exposed; police complaint filed.

Web Summary : A Dahifal Sarpanch discovered her signature was forged during a tender process for school construction. She alleges fraud and misuse of government funds, demanding a police investigation and action against those responsible for the forgery.