Beed: झोपेतून उठताच आईला बसला धक्का, एकुलत्या एक मुलाने घरातच संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:27 IST2025-08-22T12:27:24+5:302025-08-22T12:27:56+5:30
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील घटनेने खळबळ

Beed: झोपेतून उठताच आईला बसला धक्का, एकुलत्या एक मुलाने घरातच संपवलं आयुष्य
- नितीन कांबळे
कडा (बीड) : घराच्या समोरील पडवीत गळफास घेऊन एका तरुणाने जीवन संपविल्याची घटना बीडसांगवी येथे शुक्रवारी घडली. अविनाश बापू दिवटे (२३) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील अविनाश बापू दिवटे हा तरूण नेहमीप्रमाणेच जेवण करून घरात झोपला होता. शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान आईला जाग आली. यावेळी घराच्या समोरील पडवीत दोरीच्या साह्याने गळफास घेतलेला मुलाचा लटकलेला मृतदेह नजरेस पडताच त्यांना धक्काच बसला. अविनाश एकुलता एक मुलगा होता. त्याने जीवन कोणत्या कारणाने संपवलं हे अद्याप समजू शकले नाही. मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.