Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:09 IST2025-09-24T12:05:45+5:302025-09-24T12:09:20+5:30
Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या एका जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. ४० जणांनी अचानक लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. यात हाकेंचा सहकारी गंभीर जखमी झाले.

Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
Laxman Hake News: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी (२३ सप्टेंबर) रात्री साडेनऊ वाजता घडली. बीड जिल्ह्यातील सावरगावजवळ हाकेंचे निकटवर्तीय पवन कंवर हे त्यांच्या इतर दोन मित्रांसोबत जेवण करायला ढाब्यावर थांबलेले होते. त्याचवेळी ३५-४० जणांनी लाठ्या-काठ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात पवन कंवर जबर जखमी झाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केरवाडी पालम येथील रहिवासी पवन कंवर हे लक्ष्मण हाके यांच्या महत्त्वाच्या साथीदारांपैकी एक आहेत. हाकेंचे ते विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांच्यावर काही टोळक्याने अचानक प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला.
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची कार पेटवून दिल्याच्या घटनेनंतर लक्ष्मण हाकेंच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
जेवायला बसले आणि हल्लेखोर तुटून पडले
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके यांचे सहकारी पवन कंवर हे त्यांच्या इतर साथीदारांसोबत सावरगावजळील एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी थांबले होते. त्याच वेळी ३५-४० तरुणांनी त्यांच्यावर लाथा बुक्क्या आणि काठ्यांनी हल्ला केला.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी जखमींना माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. चौघांनाही करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत पवन कंवर गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, पायाला आणि हातालाही इजा झाली आहे.
दरम्यान, हल्ला केल्यानंतर सर्व हल्लेखोर फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू केला आहे.