Beed Accident: पाटोद्यात भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत सरपंचाच्या मुलाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:09 IST2025-09-24T13:08:23+5:302025-09-24T13:09:06+5:30

Beed Accident: पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटात अपघात, दोघे गंभीर जखमी

Beed: Horrific accident in Patodia; Sarpanch's son dies on the spot in bus-car collision | Beed Accident: पाटोद्यात भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत सरपंचाच्या मुलाचा जागीच मृत्यू

Beed Accident: पाटोद्यात भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत सरपंचाच्या मुलाचा जागीच मृत्यू

बीड : पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटातील वळणावर एका हॉटेलसमोर मंगळवारी सांयकाळी पावणेआठच्या सुमारास रापमची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात कारचालक असलेला थेरला (ता. पाटोदा) येथील सरपंच पुत्र मोनू चंद्रकांत राख (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला, तर विजय सानप (२९) आणि संघर्ष बांगर (२६) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी होती की, कारचा चक्काचूर झाला, तर बस रस्त्याच्या खाली गेली.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी झालेले विजय आणि संघर्ष या दोघांना बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांवरही उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Web Title: Beed: Horrific accident in Patodia; Sarpanch's son dies on the spot in bus-car collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.