Beed Accident: खाजगी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 20:00 IST2025-06-19T19:59:56+5:302025-06-19T20:00:12+5:30
Beed Accident: केज तालुक्यातील होळ शिवारात झाला भीषण अपघात

Beed Accident: खाजगी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
- मधुकर सिरसट
केज : तालुक्यातील होळ शिवारात खाजगी बस ट्रॅव्हल्स व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.१८) रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
दत्तात्रय बबन फुगारे ( ३५, रा. होळ) , व संतोष भडके (३२, रा. मोरवड ता. रेणापूर जि. लातूर) असे मयतांची नावे आहेत. दत्तात्रय फुगारे यांच्या शेतात संतोष भडके हा सालगडी म्हणून कामास होता. बुधवारी रात्री दुचाकीवर ( क्र. एम.एच. ४४ एन ८४१८) बसून हे दोघेही होळ शिवारातील ढाब्यावर जेवण्यासाठी गेले होते. जेवण करुन दुचाकीवरून परत शेताकडे येत असतानाच अंबाजोगाई कडून केजच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने ( क्र. एम.एच. २४ ए टी ९९०० ) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले.
यां घटनेची माहिती मिळताच युसूफवडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे, जमादार सीताराम डोंगरे, अमजद सय्यद, गिते,यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्हीही मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविले. गुरुवारी सकाळी दोघांच्याही पार्थिवाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे पार्थिव नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी अद्याप युसूफवाडगाव पोलिसात नोंद करण्यात आलेली नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
ट्रॅव्हल्स पोलिसांनी घेतले ताब्यात
होळ शिवारात अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स पोलिसांनी ताब्यात घेवून युसूफवाडगाव पोलीस ठाण्यात लावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांनी