Beed: जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबईला निघालेल्या केजमधील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:59 IST2025-08-28T18:58:56+5:302025-08-28T18:59:57+5:30

जुन्नर परिसरात आंदोलकाचा वाहनातचा हृद्यविकाराच्या धक्क्याने झाला मृत्यू

Beed: Farmer in Kaij who left for Mumbai for Manoj Jarange's maratha reservaion agitation dies of heart attack | Beed: जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबईला निघालेल्या केजमधील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

Beed: जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबईला निघालेल्या केजमधील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

केज (बीड) : तालुक्यातील वरपगाव येथील २० कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी दोन वाहनातून रवाना झाले आहेत. प्रवासादरम्यान आज, गुरूवारी ( दि. २८ ) सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान जुन्नर परिसरात आंदोलक सतीश ज्ञानोबा देशमुख (४५) या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

वरपगांव येथील २० आंदोलक बुधवारी सकाळी ६ वाजता वरपगांव येथून दोन वाहनातून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. जुन्नर परिसरात त्यांनी बुधवारी रात्री मुक्काम करुन गुरुवारी ( दि. २८ ) सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान चहा, नाष्टा करुन ते मुंबईकडे जात असताना वाहनातच सतीश ज्ञानोबा देशमुख ( रा वरपगांव) यांचा हृदयविकाराच्या  धक्क्याने मृत्यू झाला.

नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक जगदेवअप्पा पाटील, जमादार तळपाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथे उत्तरीय तपासणी केल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदेवअप्पा पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.सतीश देशमुख यांच्या पश्चच्यात आई, भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

प्रा गणेश धपाटे अपघातात जखमी
केज तालुक्यातील भाटुंबा येथील  प्रा. गणेश धपाटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या रॅलीतील सहभागी झाले होते. मंचरजवळ त्यांचे सहकारी चहा घेण्यासाठी थांबले असता रस्ता ओलांडताना एका भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात धपाटे गंभीर जखमी आहेत. त्यांच्या एका मांडीचे हाड मोडले आसून छातीला व डोक्यालाही मार लागला आहे. त्यांच्यावर मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे सहकारी प्रा सुनिल सोळंके यांनी दिली.

Web Title: Beed: Farmer in Kaij who left for Mumbai for Manoj Jarange's maratha reservaion agitation dies of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.