शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Beed: लेकीला अडीच लाखात विकलं! १२ वर्षांच्या चिमुकलीशी २६ वर्षांच्या तरुणाचा बालविवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:03 IST

लग्नानंतर पूजेचा घाट घातला अन् सामाजिक संस्थेच्या सतर्कतेने 'पाप' उघड झालं.

केज (बीड): छत्रपती संभाजीनगरच्या नागेवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या वडिलांना अडीच लाख रुपये देऊन मुलीशी बालविवाह केल्याची घटना समोर आली आहे. माजलगाव येथील निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था सचिवांच्या प्रयत्नाने या बालविवाहाचे बिंग फुटले असून केज तालुक्यातील नवरदेवाला बरोबर घेऊन मध्यस्थी फरार झाला आहे.

केज तालुक्यातील पन्हाळवाडी येथील विठ्ठल सुदामराव बसवर या २६ वर्षीय तरुणाने नागेवाडी, छत्रपती संभाजीनगर येथील वडीलांना २ लाख ५० हजार रुपये देऊन त्यांच्या १२ वर्षांच्या अज्ञान मुलीशी बालविवाह केल्याची घटना घडली असून माजलगाव येथील निर्धार सामाजिक सेवा भावी संस्थेच्या सचिव सत्यभामा सौंदरमल यांच्या प्रयत्नाने बालविवाहाचे बिंग फुटताच नवरदेवाला घेवून मध्यस्ती फरार झाले आहेत..

छत्रपती संभाजीनगर येथील नागेवाडी येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह केज तालुक्यातील पन्हाळवाडी येथील विठ्ठल सुदामराव बसवर (वय २६) या तरुणासोबत आठ दिवसांपूर्वी अज्ञात ठिकाणी झाला होता. २२ जानेवारीला पन्हाळवाडीत या नव दाम्पत्याचा सत्यनारायण झाला. याची माहिती मिळताच त्याच दिवशी माजलगाव येथील निर्धार सामाजिक सेवा भावी संस्थेच्या सचिव सत्यभामा सौंदरमल यांनी केजचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्याशी संपर्क साधून बालविवाहाची माहिती दिली होती. पन्हाळवाडीत सत्यनारायण झाला नसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे ते रिकाम्या हाताने परतले.

मुलीच्या मामासह मध्यस्थीने ५० हजार लाटले...बालविवाह जुळवण्यात मुलीच्या छत्रपती संभाजीनगर येथील मामाने २० हजार रुपये तर पन्हाळवाडी येथील मध्यस्थी अशोक बसवर याने ५० हजार रुपये लाटले असून २ लाख रुपये मुलीच्या वडिलांना देण्यात आले आहेत.

पोलिस अधीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश..या प्रकरणी सत्यभामा सौंदरमल यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे काही पुरावे देऊन पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी केज पोलिस उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक व्यंकराम यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Minor Girl Sold for Marriage to 26-Year-Old Man

Web Summary : In Beed, a 12-year-old girl was sold for ₹2.5 lakh and married to a 26-year-old man. An NGO exposed the illegal marriage, but the groom and facilitator fled. Police are investigating the case, involving payments to the girl's relatives and a middleman.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी