Beed Crime: परळी रेल्वेस्टेशन परिसरात चिमुकलीवर अत्याचार करणारा काही तासांत अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 20:16 IST2025-09-01T20:15:13+5:302025-09-01T20:16:02+5:30

अत्याचार प्रकरणातील आरोपीस संभाजीनगर पोलिसांनी केली अटक, रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपीचा घेतला शोध

Beed Crime: Man who abused and raped a child in Parli railway station area arrested within hours | Beed Crime: परळी रेल्वेस्टेशन परिसरात चिमुकलीवर अत्याचार करणारा काही तासांत अटकेत

Beed Crime: परळी रेल्वेस्टेशन परिसरात चिमुकलीवर अत्याचार करणारा काही तासांत अटकेत

परळी ( बीड) : येथील रेल्वे स्टेशन परिसर हादरवून सोडणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केली. रविवारी दुपारी ही संतापजनक घटना घडली होती. 

त्यानंतर रोपीस रविवारी रात्चरी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले ,आणि सोमवारी पहाटे  अटक केले. रेल्वे स्टेशन मधील सीसीटीव्ही फुटेज  परळी रेल्वे सुरक्षा बल  पोलिसांच्या सहकार्याने तपासून  बीड स्थानिक गुन्हा शाखा आणि संभाजीनगर पोलिसांनी आरोपीला बरकत नगर येथील झमझम कॉलनीतून जेरबंद केले आहे.  दररम्यान हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे, आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी  म्हणून ३ सप्टेंबर रोजी परळी शहर बंद चे आवाहन करण्यात आले आहे.

रविवारी दुपारी परळी येथील रेल्वे स्टेशन परिसरात बाहेरून मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील सहा वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. यानंतर संभाजीनगर पोलीस ठाणे, परळी रेल्वे पोलीस ठाणे तसेच रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती तातडीने आरपीएफचे पीएसआय किशोर मलकुनाईक यांनी संभाजीनगर पोलीस ठाणे निरीक्षक धनंजय ढोणे यांना फोन द्वारे कळविली. तपासाची सूत्रे हाती घेत बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत ,अंबाजोगाई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटीवाड, संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व पीएसआय किशोर मलकूनाईक (रेल्वे सुरक्षा बल), रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे,परळी शहर चे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कसून शोधमोहीम राबवली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. 

दरम्यान, पीडित बालिकेला प्रथम परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून अंबाजोगाई येथे नेण्यात आले.सध्या तिच्यावर अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा
परळीत  चिमुकलीवर हैवानी गैरकृत्य करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा, तातडीने या वृत्तीचा बिमोड करा, या मागणीसाठी 3 सप्टेंबर रोजी परळी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाणे येथे सोमवारी एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर ॲड .अरुण पाठक ,योगेश पांडकर अतुल दुबे, ज्ञानेश्वर मुंडे, आकाश चव्हाण ,सोमेश्वर गीते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Beed Crime: Man who abused and raped a child in Parli railway station area arrested within hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.