जमिन, ट्रॅक्टरसाठी मुलाची वडिलांना बेदम मारहाण, हातपाय बांधून तलावात टाकण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:44 IST2026-03-16T18:43:42+5:302026-03-16T18:44:37+5:30

क्रूरतेचा कळस! वडिलांसोबतच डोळ्यात चटणी टाकून बहीण-मेहुण्याला मारहाण; केजमधील घटना.

Beed Crime: Kaij Crime: Son Attempts to Drown Father Over Land and Tractor Dispute; FIR Filed Against 10 People | जमिन, ट्रॅक्टरसाठी मुलाची वडिलांना बेदम मारहाण, हातपाय बांधून तलावात टाकण्याचा प्रयत्न

जमिन, ट्रॅक्टरसाठी मुलाची वडिलांना बेदम मारहाण, हातपाय बांधून तलावात टाकण्याचा प्रयत्न

केज (जि. बीड): तालुक्यातील नाव्होली येथे जमीन आणि ट्रॅक्टर स्वतःच्या नावावर करण्यासाठी एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यासह बहीण आणि मेहुण्याला अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संतापलेल्या मुलाने वडिलांचे हातपाय बांधून त्यांना चक्क तलावात फेकून देऊन मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

अंगावर चटणी टाकून अमानुष मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण ठोंबरे हा त्याच्या वडिलांपासून विभक्त राहतो. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तो सासरच्या मंडळींना सोबत घेऊन नाव्होली येथे आला. त्याने वडील सुभाष ठोंबरे यांना ट्रॅक्टरची चावी मागितली आणि जमीन नावावर करून देण्याचा तगादा लावला. वडिलांनी नकार देताच लक्ष्मण आणि त्याच्या सासरच्या लोकांनी लोखंडी रॉड, बेल्ट आणि काठीने मारहाण सुरू केली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या बहीण आणि मेहुण्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.

तलावात टाकण्याचा थरार
अंगावर शहारे आणणारी बाब म्हणजे, मारहाण केल्यानंतर आरोपींनी वडिलांचे हातपाय बांधले आणि त्यांना जीपमध्ये टाकून तलावाकडे नेले. त्यांना तलावात फेकून देण्याचा त्यांचा डाव होता, मात्र काही कारणास्तव तेथून परत आणून त्यांना घरी सोडले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्यांवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title : ज़मीन, ट्रैक्टर के लिए बेटे ने पिता को पीटा, डुबोने का प्रयास।

Web Summary : बीड में, एक बेटे ने ज़मीन और ट्रैक्टर के लिए अपने पिता, बहन और बहनोई को बेरहमी से पीटा। उसने अपने पिता को बांधकर झील में डुबोने की कोशिश की। पुलिस ने दस लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Son assaults father for land, tractor; attempts drowning.

Web Summary : In Beed, a son brutally beat his father, sister, and brother-in-law over land and a tractor. He tied his father up and tried to drown him in a lake. Police have registered a case against ten people.